संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा.उदयसिंहाचा पुत्र.प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे.उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते;परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले.तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती.अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पत्करले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रतापने त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले.स्वाभिमानाचे दुसरे नाव महाराणा प्रताप मानले जाते.
जेऊर कुंभारी गावात महाराणा प्रताप जयंती दिवाळी सणा प्रमाणे साजरी केली जाते.भव्य दिव्य मिरवणूक काढली जाते.या जयंती मध्ये सर्व नागरीक सहभागी होत असतात. मात्र या वर्षी महाराणा प्रताप जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.लोकांना आपल्याच घरी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन केले.तसेच सोळके वस्ती जवळील महाराणा प्रताप फलकाचे पुजन करण्यात आले.फलकाचे पुजन शिवसुत्र युवा प्रतिष्ठाचे अध्यक्ष-सुधाकर वक्ते उपअध्यक्ष- विशाल गुरसळ सचिव- महेश सोळके यांना पुष्पहार घालून फलकाचे पुजन करण्यात आले.
या प्रसंगी राहूल चव्हाण,राहूल वक्ते,प्रदिप गायकवाड,किरण चव्हाण,विकी जगताप,विकी चव्हाण, गौतम गायकवाड,गौरव पवार,राहुल देवकर,रोहित जावळे, खंडू गांगुडे,कुलदीपक वक्ते,विश्वजीत वक्ते,खंडू गांगुडे,अक्षय गुरसळ,ऋषी गुरसळ,ऋषी सोळके,ऋषीकेश वक्ते,ऋषीकेश मेहेत्रे,साईनाथ वायकर,आदी मान्यवर उपस्थित होते.