जाहिरात-9423439946
कृषी विभाग

शेतकऱ्यांना निकष बदलून भरपाई द्या-मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आज जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे पालकमंत्री हस मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीला आ.आशुतोष काळे उपस्थित राहुन तालुक्यातील शेतीचे परतीच्या पावसाने केलेले नुकसान त्यांच्या लक्षात आणून देत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

कोपरगावसह अनेक जिल्ह्यांना बसलेल्या पावसाच्या तडाख्यामुळे मोठ्या क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असतानाच, राज्यात अनेक ठिकाणी ऑक्टोबरच्या अखेर पर्यंत ठाण मांडले आहे.शेवटच्या आठवड्यापर्यंत बरसलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे या पार्श्वभूमीवर त्यांना मदत मिळणे गरजेचे आहे-आ.आशुतोष काळे

राज्यात यंदा काहीशा उशिरानेच दाखल झालेल्या पावसाने सप्टेंबर संपल्यानंतरही काढता पाय घेतला नाही.आधीच नगर,कोपरगावसह अनेक जिल्ह्यांना बसलेल्या पावसाच्या तडाख्यामुळे मोठ्या क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असतानाच, राज्यात अनेक ठिकाणी ऑक्टोबरच्या अखेर पर्यंत ठाण मांडले आहे.शेवटच्या आठवड्यापर्यंत बरसलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले. आधीच्या कोरड्या दुष्काळाला तोंड देत शेतकऱ्याने जिवापाड जपलेले हातातोंडाशी आलेले खरीपाचे पीक अवकाळीच्या तडाख्यात आडवे पडले, जे वाचले त्याचाही दर्जा घसरला. त्यामुळे त्याचे मोलही बळीराजाच्या पदरी पडेल,याची शाश्वती नाही.भातपिकासह, कापूस,मका,सोयाबीन,द्राक्ष, डाळिंब,उसाचे पीक उद्ध्वस्त झाले आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली आहे.त्यात आ.काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील पिकांची दैना मांडली आहे.

यावर्षी जून,जुलै,ऑगस्ट व सप्टेंबर या चारही महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव मतदारसंघातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.आ.आशुतोष काळे यांनी सदर परिस्थिती पंचनामा अहवालाच्या माध्यमातून ना. हसन मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिली व शेतकऱ्यांना निकष बाजूला ठेऊन मदत करावी अशी मागणी केली. तसेच पीकविमा व ट्रीगरचे निकष बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कोपरगाव मतदारसंघातील कृषी,कोरोना,महावीतरणचा भोंगळ कारभार आदी विभागांचा ना.हसन मुश्रीफ यांनी आढावा घेतला आहे.

या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा ना. राजश्री घुले,नूतन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, लपोलीस अधीक्षक मनोज पाटील,विभागीय आयुक्त,जिल्हा आरोग्य अधिकारी,अधीक्षक अभियंता आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Close