जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

परप्रांतीय मजुरांना जिल्हा हद्दीपर्यंत पोहचवा-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना विषाणूच्या भयप्रद साथीमुळे सारेच नागरिक भयग्रस्त झाला असले तरी यात सर्वाधिक हाल परप्रांतीय मजुरांचे झाले असल्याने त्यांना आपल्या गावी कुणासाठी मोठी यातायात करावी लागत असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांना जिल्हा हद्दीपर्यंत जाण्यासाठी शासकीय वहांनाची सोय करून पोहच करावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे.

कोरोना टाळेबंदीमुळे या कामगार,मजुरांना रणरणत्या उन्हात उपाशीपोटी पायपीट करायची दुर्दैवी वेळ आली आहे. कोपरगाव शहराबाहेरून जाणाऱ्या नगर-मनमाड या महामार्गावरून जाताना हे मजूर दिसत आहेत. देशभरात १७ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या परप्रांतीय नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी आपल्या माणसांची लागलेली ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही.त्यांना आता घराकडे जाण्यासाठी थोडी सवलत जाहीर करण्यात आली आहे.

सरकारने सलग तिसऱ्यांना देशभरात टाळेबंदी वाढविल्याने मुंबई,ठाणे परिसरातील परप्रांतीयांचे लोंढे दररोज मुंबई पुण्यातून बाहेर पडत आहेत.उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश,बिहार,मध्य प्रदेश या राज्यातील कामगारांवर करोनामुळे उपासमारीचे सकंट कोसळले आहे.त्यामुळे यापुढे आयुष्यात परत मुंबईला जाणार नाही, मुंबईपेक्षा गड्या आपला गावच बरा ! असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ या मजुरांवर आली आहे.मुंबई,पुण्याहून आदी ठिकाणाहून पायीच गावाकडे निघालेल्या या मजुरांचे लोंढे मुंबई-आग्रा,पुणे-इंदोर,नगर-मनमाड,मुंबई-नागपूर आदी महामार्गावर दिसत आहेत.

या टाळेबंदीमुळे या कामगार,मजुरांना रणरणत्या उन्हात उपाशीपोटी पायपीट करायची दुर्दैवी वेळ आली आहे. कोपरगाव शहराबाहेरून जाणाऱ्या नगर-मनमाड या महामार्गावरून जाताना हे मजूर दिसत आहेत. देशभरात १७ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या परप्रांतीय नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी आपल्या माणसांची लागलेली ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही.त्यांना आता घराकडे जाण्यासाठी थोडी सवलत जाहीर करण्यात आली आहे. मुंबई,पुण्याहून निघालेले हे मजूर मध्य प्रदेश,इंदूर,पंजाब,राजस्थान.इलाहाबाद,हरियाणा आदी ठिकाणी जाण्यासाठी पायीच निघाले आहेत.तर काही सायकलचा वापर करत आहे.त्यांना बऱ्याच वेळा अन्नही मिळणे दुरापास्त होत आहे.मिळेल त्या अन्नावर गुजराण करत त्यांचा हा भर उन्हात त्यांचा हा पायाला फोड येईपर्यंत प्रवास चालू आहे.माणुसकीच्या नात्याने जिल्हा प्रशासनाने त्यांची जिल्हा हद्दीपर्यंत वाहनांची सोय केली तर त्यांना तेवढाच दिलासा मिळेल असे आवाहनही कोपरगाव पालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close