जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गोदावरी पात्रात वाळूचोरांचा धिंगाणा सुरु !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात व राज्यात कोरोनाने कहर माजवलेला असताना प्रशासन त्यावर मात करण्याचा कसोशीने प्रयत्न करत असताना वाळूचोरांनी हि संधी साधली नाही तर नवल ! सध्या कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील सुरेगाव,कोळगाव थडी,कोळपेवाडी,सांगवी भुसार आदी परिसरात याची अनुभूती येत असून रात्रीच्या सुमारास वाळूचोर या संधीचा पुरेपूर उपयोग करताना दिसत आहे.त्यामुळे या नाजूक समयी प्रशासन या मुजोर वाळूचोरां विरुध्द कारवाई करणार का ? असा सवाल निर्माण झाला आहे.

कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंध घातलेला असतानाही वाळूचोर वाळूला प्रचंड भाव मिळत असल्याने वाळूचोरी करताना थांबताना दिसत नाही.त्यामुळे अवैध वाळू उपसा प्रतिबंधक पथकाने महसूल पथकाने मिळालेल्या माहितीनुसार छापे टाकून वाळू चोरांना चाप लावण्याचे काम सुरु ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाळु चोरी हा गोदावरी नदीसाठी व कोपरगाव तालुक्यांसाठी नाजूक प्रश्न बनला आहे.वाळूचोरीच्या गोदावरी खोऱ्यातील शेती उद्योग उध्वस्त झाला आहे.तरीही यातून कुठलाही बोध घेण्याच्या तयारीत वाळूचोर दिसत नाही.या व्यवसायातून प्रचंड धन मिळत असल्याने हे वाळूचोर चटावलेले आहे.यातून तालुक्यात अनेक खून पडले आहेत.तरीही या अवैध व्यवसायातील नागरिकांना शहाणपण येण्याची शक्यता दिसत नाही.कोळगावथडी वनविभागाच्या मार्गाने गोदावरी नदीकडे जाणारा रस्ता करण्यासाठी जे.सी.बी. व मजुरांकरवी रस्ता करण्याचे नियोजन सध्या जोरात सुरु आहे.काही मजूर रस्ता करतात व रात्री कोळगावथडी व कोळपेवाडी येथील दार वर्षी आपले उखळ पांढरे करणारे वाळु चोर जेसीपीच्या सहाय्याने या टाळेबंदीच्या काळात संधी साधत २० ते २५ टक्टरच्या सहाय्याने वाळूचोरी चालु आहे.या वाळूचोरीकडे आता महसुल,पोलीस़,लोकप्रतिनिधी,स्थानिक सरंपच,पोलीस पाटील गावकरी आदीनीं वाळू चोरीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.अवैध वाळु चोरीसाठी रस्ता देणाऱ्यांवरही तात्काळ गुन्हे दाखल करण्याची गरज निर्माण झाली आहे.वारंवार या चोरीच्या गुन्हयात आढळणाऱ्यावर कठोर शासन करणे गरजेचे बनले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close