कोपरगाव तालुका
कोरोनाला हद्दपारीसाठी सरपंचांनी जबाबदारी उचलावी -आवाहन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
या बैठकीसाठी पंचायत समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.मात्र पत्रकारांना या बैठकीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते.गत पंधरा दिवसापासून सत्ताधारी गट पत्रकारांपासून दूर राहून आपले साहजिक कार्य (?) जोमाने पुढे नेताना दिसत असून माध्यमांना गृहीत धरून आपले घोडे दामटण्याचे त्यांचे काम इमाने-इतबारे चालू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १६५ ने वाढून ती ४२ हजार ६७० इतकी झाली असून १३९५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या १२ हजार २९६ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ५२१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ४२ वर जाऊन पोहचली आहे तर चौघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.जवळच येवला मालेगाव हि कोरोनाची नवीन केंद्रे बनली आहे.या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी पंचायत समिती सभापती,उपसभापती, जिल्हा परिषद ,पंचायत समिती सदस्य, सरपंच, पंचायत समितीचे अधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी यांची पंचायत समितीच्या सभागृहात बैठक आयोजित केली होती त्यावेळीते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,अंगणवाडी सेविका,आशा सेविका व मदतनिसांच्या सहाय्याने नागरिकांच्या सुरु असलेल्या आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करावे.एकही नागरिक आरोग्य तपासणीतून सुटता कामा नये.नोकरी व्यवसायानिमित्त परजिल्हा व परराज्यात असलेल्या कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना कोपरगाव तालुक्यात येण्यासाठी शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या परवानगीनुसार यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.त्यामुळे या बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी काळजी पूर्वक करून घ्या.इतर गावांतून आपल्या गावात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करूनच त्यांना गावात प्रवेश द्यावा.यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार कोविड-१९ समिती स्थापन करून प्रत्येक गावात तरुणांचे ग्राम सुरक्षा दल स्थापन करा. टाळेबंदीत काहीअंशी सूट मिळालेली असली तरी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य द्या.अनेक गावांमध्ये सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे व मंजूर रस्त्यांची कामे पावसाळा सुरू होण्याच्या आत पूर्ण करून घ्यावी कोरोनाबाबत योग्य खबरदारी घेऊन नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवा आदी सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सरपंचांना दिल्या.या बैठकीसाठी पंचायत समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.मात्र पत्रकारांना या बैठकीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते.