जयंती,पुण्यतिथी अभिवादन
कोपरगावात गजानन महाराज प्रकट दिन होणार साजरा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील श्री गजानन महाराज सत्संग मंडळाच्या वतीने बुधवार दि.२३ फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन आयोजित केला असून त्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.या निमित्ताने ह.भा.प.निलेश महाराज पवार यांचे ‘रघुनंदन कार्यालय’ येथे सकाळी १० वाजता जाहीर प्रवचन आयोजीत केले असल्याची माहिती मिळाली असून या कार्यक्रमाचा लाभ शहर व तालुक्यातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा (संप्रदाया) चे भारतीय गुरू होते.त्यांना भगवान गणेश यांचा अवतार मानला जातो.त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही,परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या वयाच्या ३० व्या वर्षी १८७८ च्या फेब्रुवारी महिन्यात २३ तारखेला दिसले.त्यांचे अनुयायी ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून पाळतात.कोपरगाव शहरात त्यांच्या भक्त मंडळाने प्रकट दिनाचे आयोजन केला आहे.
या नितीत्त सकाळी ०७ वाजता अभिषेक संपन्न होणार आहे.तर या निमित्ताने लासलगाव येथील ह.भ.प.निलेश महाराज पवार यांचे ‘रघुनंदन कार्यालय’ येथे सकाळी १० वाजता जाहीर प्रवचन आयोजीत केले असल्याची माहिती मिळाली असून दुपारी १२.३० वाजता मुख्य प्रकट दिन संपन्न होणार आहे.नैवैद्य आरती आणि त्या नंतर उपास्थित भाविकांना महाप्रसाद वाटप होणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ शहर व तालुक्यातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री गजानन महाराज सत्संग मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.