जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

वनविभागाच्या झाडांची..या विभागाने केली कत्तल !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव सोनेवाडी रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या सामाजिक वनीकरणाच्या झाडांची महावितरण विभागाकडून मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच केवळ झाडांच्या लाकडांच्या मोबदल्यात काही लोकांकडून करून घेत असलेली घटना उघडकीस आली आहे. सामाजिक वनविभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले असून वृक्षप्रेमींनी झाडांची होणारी कत्तल थांबविण्याची मागणी केली आहे.

वनांचे महत्त्व आपण सर्वांनीच ओळखले आहे. जगाच्या पाठीवर काही देश असे आहेत की, त्यांची ओळख त्या देशामध्ये असलेल्या समृध्द वनांमुळे जगाला झाली आहे. सर्वसाधारणपणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असणे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या राज्यात २० टक्क्यांच्या जवळपास क्षेत्र वनाखाली आहे. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विविध नैसर्गिक आपत्तींना सतत सामोरे जावे लागत आहे.मात्र याकडे शासनाच्या काही विभागांचेच दुर्लक्ष होताना दुर्दैवाने दिसत आहे.

वनांचे महत्त्व आपण सर्वांनीच ओळखले आहे. जगाच्या पाठीवर काही देश असे आहेत की, त्यांची ओळख त्या देशामध्ये असलेल्या समृध्द वनांमुळे जगाला झाली आहे. सर्वसाधारणपणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असणे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या राज्यात २० टक्क्यांच्या जवळपास क्षेत्र वनाखाली आहे. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विविध नैसर्गिक आपत्तींना सतत सामोरे जावे लागत आहे. वृक्ष पृथ्वीवरील वातावरण शुद्ध करण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात.त्यामुळे शासनाने वृक्षलागवाडीवर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे.व वृक्षतोडीस कायदेशीर विरोध केलेला आहे.जी झाडे मृत वा वाळली असतील तर त्यासाठी शासनाची परवानगी घेणे क्रमप्राप्त केले असताना वर्तमान काळात या नियमांची थेट पायमल्ली सोनेवाडी-पोहेगाव रस्त्यावर होताना दिसत आहे.

शासनाच्या सामाजिक वनीकरणाच्या मार्फत सोनेवाडी ते पोहेगाव रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली. गेली तीन वर्षे या झाडांचे संगोपन करत त्यांनी उन्हाळ्यातही टॅंकरने पाणी घातले.लाखो रुपये खर्च करून ही झाडे वाढवली. आता झाडांची पूर्णक्षमतेने वाढ झाली असून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना शीतल सावली देण्याचे काम हे झाडे करत आहे मात्र वाढलेली झाडे वीज वितरण कंपनीने टाकलेल्या सोनेवाडी पोहेगाव शिवारातील नऊचारी येथील तारांना स्पर्श करत असल्याचे कारण पुढे करत वीज वितरण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीं या झाडांची कत्तल करण्याचा सपाटा लावला आहे.स्थानिक वृक्ष तोडणाऱ्या लोकांना हाताशी धरत त्यांनी केवळ सरपणाच्या बदल्यात या काही झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली.याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी उर्मट उतर दिले आहे. मात्र वाढलेल्या झाडांचा अडथळा होत असल्यास हि वृक्षतोड काही अंशी क्षम्य मानता येईल मात्र त्याचा इथे उलटा अनुभव येताना दिसत आहे.कोपरगाव येथील सामाजिक वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पोहेगाव सोनेवाडी रस्त्यावर लावलेल्या वनविभागाच्या झाडांची कत्तल ताबडतोब थांबवावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे जर झाडांची कत्तल थांबवली नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close