जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..आता सारीचाही कोपरगावात पहिला बळी !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना या विषाणूने देशभरात खळबळ उडवून दिलेली असताना आता पाठोपाठ सारी नावाच्या आजारानेही अहमदनगर जिल्ह्यात डोके वर काढले असून कोरोनानंतर आता कोपरगाव तालुक्यात सारीचा पहिला मृत्यू शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या बाबत आमच्या प्रातिनिधीने या बाबत आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपला दूरध्वनी उचलण्याची तसदी घेतली नाही.त्यामुळे कोपरगाव शहरातील माध्यमांना व त्यांच्या प्रतिनिधींना या नगर येथून अन्यत्र प्रसिद्ध झालेल्या बातम्या वाचण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या बेपर्वाईबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.अधिकृत बातम्या द्यायला टाळाटाळ करायची व उद्या चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर माध्यमांना दूषणे द्यायची असे काहीसे होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे.यात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे.

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर या उपनगरातील एक साठ वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे नुकतेच निष्पन्न होऊन त्यात या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.त्या महिलेच्या नातेवाईकांना त्या महिलेचा अंत्यविधी करण्यासही संधी मिळाली नाही.व तिला लागण कशी झाली याचा तपास लागला नसतानाच हि दुसरी घटना उघड झाली आहे.त्यामुळे पहिल्या घटनेने कोपरगाव तालुका हादरलेला असतानाच संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या लगत असलेल्या ग्रामीण भागातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीतील ६५ वर्षीय महिला सारीमुळे मृत झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सेवीअर अ‍ॅक्युट रिस्पायरेटरी इलनेस अर्थात सारी आजाराची लक्षणं ही कोरोना सारखीच आहेत. यामध्ये रुग्णाला सर्वसाधारणपणे ३८ अंश सेल्सिअस ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणं असतात. हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते. ते विषाणूमुळे किंवा साथीमुळे अशा दोन्ही प्रकारे असू शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरुपाचे आहे.

त्यामुळे नागरिक पहिल्या धक्क्यातून सावरत नाही तोच हा दुसरा धक्का अकस्मितपणे बसला आहे. या महिलेच्या कुटुंबातील ७ जणांनाही प्रशासनाने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. याशिवाय गावातही आरोग्य यंत्रणेने आपली शोध मोहीम हाती घेतली आहे. १० तारखेला या महिलेला कोरोना संशयित म्हणून नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविले होते. तेथे तिची कोरोना तपासणी अहवाल प्रथम नकारात्मक आला होता.मात्र नंतरच्या अहवालात मात्र तिला सारीची लागन झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कोपरगावच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close