नगर जिल्हा
..या गावात प्रधानमंत्री योजने अंतर्गत मोफत तांदूळ वाटप
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील लोहगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांच्या स्वस्त धान्य दुकानात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा मोफत तांदूळ वाटपाचा शुभारंभ सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे उपसरपंच सुरेश चेचरे कामगार तलाठी सौ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे म्हणाले की सदरचा मोफत तांदूळ हा प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय योजनेच्या पात्र कुटुंबासाठी प्रति व्यक्ती पाच किलो या प्रमाणे आहे तसेच ज्या कुटुंबांनाा या योजनेचा लाभ मिळाला नाही अशांना माहे मे २०२० या महिन्या पासून मिळेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सस सिंग पाळावे सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवूूून व तोंडाला मास्क बांधून तांदूळ घेण्यासाठी यावे कोणताही लाभार्थी या योजने वंचित राहणार नाही.याची पुरेपूर काळजी घेतली जाईल असे आश्वासन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे यांनी यावेळी बोलताना दिले आहे.
या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष अशोक चेचरे,संचालक भाऊसाहेब चेचरे,कामगार पोलीस पाटील वसंतराव चेचरे, माजी सरपंच गणेश चेचरे,शांताराम चेचरे, सतिश गिरमे, बाळासाहेब चेचरे, बाळासाहेब दरंदले, कृष्णा चेचरे, शरद चेचरे, सुरेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.