जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

…या जेष्ठ तमाशा कलावंतास पाच लाखांची मदत

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिर्डी (प्रतिनिधी)

ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे-कोपरगावकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या‌ हस्ते पाच लाखांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात या मदतीचे वाटप करण्यात आले ‌आहे.

वर्तमानात तमाशा कलावंत शांताबाई शिर्डी येथील द्वारकामाई वृध्दाश्रमात राहत आहेत.शांताबाई लोंढे सध्या त्यांचे भाचे कोंडीराम मार्तंड लोंढे व राजू मार्तंड लोंढे यांच्या समवेत गजानन नगर,कोपरगाव येथे राहात होत्या.ते त्यांची सांभाळ करीत आहेत.

मागील काही दिवसांपासून शांताबाईंची वृध्दापकाळात परवड सुरु असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या वृत्ताची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शांताबाईंचे पुनर्वसन करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.

मुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नुकतीच तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे-कोपरगावकर यांची द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट घेत त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली होती. वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्या वतीने वृद्ध कलावंत मानधन योजने अंतर्गत सन-२००९ पासून त्यांना वर्ग ‘क’ कलाकार म्हणून दर महिन्याला २२५० रुपये मानधनही शांताबाईंना देण्यात येत आहे.

सध्या शांताबाई शिर्डी येथील द्वारकामाई वृध्दाश्रमात राहत आहेत.शांताबाई लोंढे सध्या त्यांचे भाचे कोंडीराम मार्तंड लोंढे व राजू मार्तंड लोंढे यांच्या समवेत गजानन नगर,कोपरगाव येथे राहात होत्या.ते त्यांची सांभाळ करीत आहेत.परंतु वार्धक्य व त्यांची मानसिक अवस्था वेळोवेळी विचलीत होत असल्याने ते बऱ्याच वेळा घराच्या बाहेर राहात असल्याची माहिती त्यांच्या नातलगांनी दिली.यापुढे त्या द्वारकामाई वृद्धाश्रम येथेच निवास करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेमुळे शांताबाईंना तात्काळ पाच लाखांची मदत मिळाली आहे.शासन मदतीबद्दल शांताबाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे‌‌त.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close