कोपरगाव तालुका
“सिल्वरझोन आॕलम्पियाड”परिक्षेत आत्मा मालिकचा विद्यार्थी

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सिल्वरझोन इंटरनॅशनल आॕलम्पियाड हि परीक्षा एन. सी. ई.आर.टी.अभ्यासक्रमानूसार प्रत्येक वर्षी इंग्रजी,गणित,विज्ञान व सामान्यज्ञान इ. विषयांसाठी संपन्न झालेल्या स्पर्धा परिक्षेत आत्मा मालिकचा विद्यार्थी अमित कनोजा हा विद्यार्थी देशात द्वितीय क्रमांकाने निवडला गेला आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हि स्पर्धा परीक्षा दोन रांउडमध्ये आयोजित केली जाते.जे विद्यार्थी दुसऱ्या रांउडमध्ये निवडले जातात त्यामधून केंद्र,राज्य व देशपातळीवर विद्यार्थी गुणवत्ता यादी फेब्रुवारी- मार्च महिन्यात येते . या परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून त्यात आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरूकुलाचा इयत्ता ६ वीत शिकणारा कनोजा अमित प्रविण हा विद्यार्थी देशात तृतिय क्रमांकावर निवडला गेला आहे.तो १०,००० रु. शिष्यवृत्ती तसेच विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र , राष्ट्रीयस्तर ट्राँफी व गोल्ड मेडल इ. शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे.
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरूकुलाचे एकूण ८० विद्यार्थी द्वितीय रांउडसाठी पात्र ठरले. त्यापैकी ९ विद्यार्थी राज्यपातळीवर निवडले आहे. त्यात सरदार रितीक इयत्ता ५वी व कर्जुले शुभम इयत्ता ६वी हे राज्यात तृतीय व मुसमाडे रितेश , त्रिपाठी मयंक , वाकचौरे शिव , राशिनकर साईराम , जोशी धिरज , पाटील अनुराग व जेजूरकर प्रणव ( राज्यात प्रथम ) इ. विद्यार्थी पात्र ठरले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सिल्वरझोन इंटरनॅशनल आॕलम्पियाड तर्फे विविध वस्तू व विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र व राज्यस्तरिय सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरूकुलाच्या परंपरेत पुन्हा एकदा राष्ट्रीय दर्जाचा इतिहास घडवण्यामागे आत्मा मालिक पॕटर्नचा अभ्यासक्रम , त्याचे नियोजन,विद्यार्थी व शिक्षकांचे आपार कष्ट इ. मुळेच हा निकाल लागला असे गुरूकुलाचे प्राचार्य माणिक जाधव यांनी सांगितले .
यशस्वी विद्यार्थ्यांचे परमपुज्य आत्मा मालिक माऊली,परमानंद महाराज,अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटनिस हनुंमतराव भोगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, वसंतराव आव्हाड तसेच उपप्राचार्य नितीन सोनवणे,प्राथमिक विभाग प्राचार्या मिना, सर्व पर्यवेक्षक व सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी आदीनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.