जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या नेत्याच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम रद्द

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाण्याचे माजी अध्यक्ष व माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंती निमित्त ६ एप्रिल रोजी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत असल्यामुळे सम्पूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोणतेही कार्यक्रम घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.त्या सूचनांचा आदर करून काळे परिवाराच्या सूचनेनुसार ६ एप्रिल रोजी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.त्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी याची नोंद घ्यावी.दरवर्षी मोठ्या संख्येने हितचिंतक व कार्यकर्ते कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यासाठी गर्दी करीत असतात मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कार्यकर्त्यांनी अभिवादन करण्यासाठी स्मृती उद्यान येथे येऊ नये असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष आगवन यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close