जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या परिसरात गावठी दारूचा उच्छाद !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

संवत्सर-(प्रतिनिधी)

एकीकडे कोरोना विषाणूने पसरत असलेल्या साथीने प्रशासन हैराण झालेले असताना दुसरीकडे व्यसनाधीन झालेल्या नागरिकांची डोकेदुखी वाढत चालली असून हे नागरिक ना पोलिसांना घाबरत आहेत ना या कोरोना विषाणूंला. त्यामुळे संवत्सर परिसरात गावठी दारूचे अड्डे यांना मोठ्या परिसरात मोठी बरकत आली असून या अवैध दारुचा एखादी दुर्घटना होण्यापूर्वी कोपरगाव तालुका पोलिसानी बंदोबस्त करावा अशी मागणी संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.

राज्यात वर्तमान काळात कोरोना साथीने उच्छाद मांडला आहे.याचा बंदोबस्त करण्यासाठी तालुका प्रशासनाची सर्व शक्ती एकवटली आहे.नागरिकांना बाहेर फिरू नका म्हटले तरी त्याचे गांभीर्य नागरिकांना कळत नाही.अनेकवेळा बाहेर फिरणारे नागरिक हे कोणत्या तरी व्यसनाला बळी पडलेले असतात असे दिसून येत आहे. तसे ते अनेक ठिकाणी अनुभवयास मिळत आहे.राज्यात तर दारुड्या इसमानी दारूचे दुकास भर दिवसा फोडल्याची घटना घडली आहे.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.

राज्यात वर्तमान काळात कोरोना साथीने उच्छाद मांडला आहे.याचा बंदोबस्त करण्यासाठी तालुका प्रशासनाची सर्व शक्ती एकवटली आहे.नागरिकांना बाहेर फिरू नका म्हटले तरी त्याचे गांभीर्य नागरिकांना कळत नाही.अनेकवेळा बाहेर फिरणारे नागरिक हे कोणत्या तरी व्यसनाला बळी पडलेले असतात असे दिसून येत आहे. तसे ते अनेक ठिकाणी अनुभवयास मिळत आहे.राज्यात तर दारुड्या इसमानी दारूचे दुकास भर दिवसा फोडल्याची घटना घडली आहे.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.अनेक जण तंबाखू,विडी,सिगारेट,गुटखा,दारू वा तत्सम व्यसनांच्या आहारी गेलेले असल्याने या बंदचा सर्वाधिक फटका या दारू उत्पादन शुल्काच्या लाडक्या प्राण्यांना बसला असल्याचे दिसत आहे.हे अतृप्त आत्मे पोलिसांची नजर चुकवून शहरात किंवा खेड्याच्या कोणत्या कोपऱ्यात दुकान उघडे दिसते याच्या शोधात कायम दिसतात.बऱ्याच वेळा त्यांचा हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे.

त्यामुळे पोलीस गाडी पुढे जाते ना जाते तोच हि मंडळी आपली शिकार (?) कोठे आहे याच्या शोधात बाहेर पडुन आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसतात.व जेथे त्यांचे व्यसनपूर्ती केंद्रे आहेत त्याच्या जवळपास एखाद्या पक्षासारख्या घिरट्या घालताना दिसत आहे.संवत्सर परिसरात याचाच दाहक अनुभव सध्या येत असून लक्ष्मणवाडी,दशथवाडी,रामवाडी,मनाई वस्ती, रेल्वे स्थानक,आदी ठिकाणी हि मंडळी सकाळी व सांयकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना आढळून येत आहे.त्यातच लक्ष्मणवाडी, दशरथ वाडी परिसरात काही नागरिक जमातवरून आल्याने त्यांना भेटण्यास मोठ्या संख्येने तालुक्यातून व तालुक्याबाहेरून मंडळी येताना दिसत आहेत हे सर्व धक्कादायक दिसत असून ग्रामस्थांच्या जीवितास धोका होऊ शकतो अशी शक्यता गावातील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.दरम्यान गावाचे उपसरपंच विवेक परजने यांनी या गावठी दारूचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close