जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कत्तलीसाठी जनावरे बाळगली,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील आयशा कॉलनीत रहिवाशी असलेला आरोपी मुस्ताक मुसा कुरेशी (वय-३८) याने आपल्या आर्थिक फायद्यासाठी भाकड जातीची १ लाख ५० हजार रुपये किमतीची दोन मोठ्या गायी व एक लहान वासरू व एक टाटा एस.वाहनासह असे तीन जनावरे बेकायदा बाळगल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे बेकायदा कत्तलीसाठी गोवंश पाळणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ जिल्ह्यात संचारबंदी केलेली असताना या आदेशाचे उल्लंघन करून आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी कोपरगाव शहरातील आरोपी मुस्ताक कुरेशी याने दोन मोठ्या गायी व एक लहान वासरू अशी तीन गोवंश भाकड जनावरे यांना क्रूर वागणूक देऊन कत्तलीसाठी आपल्या स्वतःच्या ताब्यात बाळगली असल्याची बाब शहर पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून मिळाली.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी तातडीने हालचाल करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

वर्तमानात देशात कोरोना विषाणूने कहर केला आहे.देशात कडक बंद पाळण्यात येत आहे.नागरिकांना आपल्या घराच्या बाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.जिल्हाधिकारी यांनी यासाठी जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ जिल्ह्यात संचारबंदी केलेली असताना या आदेशाचे उल्लंघन करून आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी कोपरगाव शहरातील आरोपी मुस्ताक कुरेशी याने दोन मोठ्या गायी व एक लहान वासरू अशी तीन गोवंश भाकड जनावरे यांना क्रूर वागणूक देऊन कत्तलीसाठी आपल्या स्वतःच्या ताब्यात बाळगली असल्याची बाब शहर पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून मिळाली.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी तातडीने हालचाल करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या व त्याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.कॉ.सुरजकुमार जीवन अग्रवाल यांनी गु.र.नं.११९/२०२० भारताच्या प्राण्यास निर्दयीपणे वागविण्याचा अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ह)व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५(ब) ९ प्रमाणे व भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.व आरोपीच्या ताब्यातील २२ हजारांच्या दोन जरशी गाया,३ हजार रुपये किमतीचे लहान काळे रंगाचे वासरू,व एक टाटा एस कंपनीचे वाहन असा एक लाख ५० हजार रुपये किमतीचा माल आपल्या ताब्यात घेतला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close