जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या गावातील भाजप कार्यकर्त्यांचा पक्षाला निरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांच्या कामाने प्रभावित होऊन राहाता तालुक्यातील शिंगवे गावातील असंख्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करून आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती त्या त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने दिली आहे.

वर्तमानात लोकसभा आणि विधानसभा,नगरपरिषदा,जिल्हा परिषदा,पंचायत समित्यांच्या निवडणूका जवळ आल्या असल्याने आता विविध पक्ष आपल्याकडे दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्याना खेचून घेण्यात मश्गुल आहेत.त्यामुळे जवळपास स्पर्धां निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.राहाता तालुका त्याला अपवाद नाही.

वर्तमानात लोकसभा आणि विधानसभा,नगरपरिषदा,जिल्हा परिषदा,पंचायत समित्यांच्या निवडणूका जवळ आल्या असल्याने आता विविध पक्ष आपल्याकडे दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्याना खेचून घेण्यात मश्गुल आहेत.त्यामुळे जवळपास स्पर्धां निर्माण झाल्याचे दिसत असून अशीच घटना नूकतीच राहाता तालुक्यातील शिंगवे ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.त्याचे राष्ट्रवादीतून स्वागत होत आहे.

सदर प्रसंगी गणेश काळे,सचिन काळे,पोपटराव काळे,रमेश काळे,विजय काळे,बाबासाहेब बाभूळके,योगेश सालपुरे, चांगदेव काळे,संतोष काळे,विजय बरवंट,सुखदेव जाधव,रविंद्र सालपुरे,मच्छिन्द्र बरवंट,तन्मय बरवंट,अनिल बरवंट, महेश काळे,विकास बरवंट,अमोल शिंदे,गोरख जाधव,लक्ष्मण थोरे,नितीन काळे या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश जाधव,पद्माकर सुराळकर,ज्ञानदेव चौधरी,बाळासाहेब बाभूळके,प्रमोद चौधरी,बाबासाहेब पवार,पोपटराव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीतून स्वागत होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close