जाहिरात-9423439946
विशेष दिन

…या शहरात ‘जागतिक छायाचित्रकार दिन’ साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुका फोटोग्राफर एकता ग्रुप यांच्या वतीने,’जागतिक छायाचित्रकार दिन’सामाजिक कार्याने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

कोपरगाव शहर व तालुका फोटोग्राफर एकता ग्रुप यांच्या छायाचित्रकरांनी आपले समाजाला काही देणे लागतो या सामाजिक भावनेतून ‘पद्मा मेहता प्राथमिक शाळे’स तीन धुळमुक्तीसाठी पेटारे भेट स्वरूपात दान दिले आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सन-१८३७ मध्ये फ्रेंच कलाकार आणि छायाचित्रकार लुईस-जॅक-मँडे दागैर यांनी सर्व प्रथम डग्युरोटाइपचा शोध याच दिवशी लावला होता. डग्युरोटाइप म्हणजे आयोडीन-संवेदनशील सिल्व्हर प्लेट आणि पारा वाष्प वापरून सुरुवातीच्या फोटोग्राफिक प्रक्रियेद्वारे घेतलेले छायाचित्र.या शोधाची तारीख १९ ऑगस्ट आहे.लुईस-जॅक-मँडे दागैर यांची छायाचित्रणाची ही कल्पना फ्रेंच अकादमी ऑफ सायन्सेस यांनी विकत घेतली,जी जगासाठी महत्त्वाची ठरली, तो दिवस १९ ऑगस्ट १८३९ हा होता.त्यामुळेच या दिवशी जगातीक छायाचित्रणाचा दिवस साजरा करण्यात येतो. असे असले तरी जागतिक छायाचित्रण दिवस साजरा करण्यात यावा अशी कल्पना १९९१ पर्यंत कुठेही अस्तित्त्वात नव्हती,याचे श्रेय भारतीय छायाचित्रकार ओपी शर्मा यांच्याकडे जाते हे येथे उल्लेखनीय.त्यामुळे जगभरातील छायाचित्रकार त्यांचे ऋणी असल्याचे सांगतात.त्यामुळे हा ‘जागतिक छायाचित्र दिन’ कोपरगाव तालुक्यातील छायाचित्रकारांनी एकत्र येऊन मोठया उत्साहात साजरा केला आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छायाचित्रकार हेमचंद्र भवर हे होते.

सदर प्रसंगी एस.नाईन’या वाहिनीचे प्रतिनिधी युसुफ रंगरेज,महेश नाईक,अरूण कदम,प्रवीण आभाळे,नंदू पंडोरे,सागर पवार,मयुर चव्हाण,हेमचंद्र भवर,बिपीन गायकवाड,सहाय्यक फौजदार गजानन वांढेकर,नाजगड,राजू शेख,तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका,विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ फोटोग्राफर हेमचंद्र यांनी फोटोग्राफर यांची पूर्वीची व आत्ताच्या कलेची व आर्थिक परिस्थितीची माहिती दिली.

यावेळी शाळेच्या वतीने सर्व छायाचित्रकरांचा सन्मान करण्यात आला.तसेच आज रोजी शाळेत मेहंदी स्पर्धा निमित्त युसुफ रंगरेज आणि हेमचंद्र भवर तसेच एकता फोटोग्राफर ग्रूप यांचे वतीने रोख स्वरूपात पारितोषिके देण्यात आली आहे.

सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष दरेकर यांनी प्रास्ताविक केले आहे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आव्हाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार अरुण कदम यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close