शैक्षणिक
कोपरगाव शहरात एक दिवसीय विज्ञान महोत्सव संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे विज्ञान दिनाचे औचित्य साधून मायक्रो-कार्निवल या एक दिवसीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.
भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी ‘राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद’ आणि ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या’ अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.कोपरगाव येथील के.जे.सोमैय्या महाविद्यालयात तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी विविध विभागातील मुलांनी वेगवेगळे विज्ञान मॉडेल्स तयार केले होते व त्याचे प्रदर्शन मांडण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी यांच्या प्रतिनिधीस दिली आहे,
सदर मायक्रो-कार्निवल कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून नाशिक येथील एच.पी.टी आणि आर.वाय.के महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.एल.पी.शर्मा व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे उपस्थित होते.सदर विज्ञान दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने प्रा.डॉ.एल.पी.शर्मा यांचे “ए जर्नी इन द इनव्हिजिबल वर्ल्ड” ह्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमासाठी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बी.बी.भोसले,प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.डी.गवळी व कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात पदवी व पदव्युत्तर विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. आकाश पवार, प्रा.योगेश चौधरी,प्रा.पूजा गख्खड,प्रा.मिलीता वंजारे,प्रा.राजश्री राऊत, प्रा.उर्मिला अहिरे,प्रा. प्रज्ञा कडू, प्रा.धीरज माळी,व प्रा.शगुना गव्हाळे,अमोल दहे आणि विद्यार्थी प्रतिनिधी ऋषिकेश जाधव आदींनी परिश्रम घेतले.