जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

“त्या” नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत पूनम चित्रपट गृहासमोरील अतिक्रमण हटविल्या प्रकरणी आकस धरून तत्कालीन उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांना नगरसेवक योगेश बागुल व कैलास जाधव यांनी मारहाण केल्या प्रकरणी संबंधित नगरसेवक अपात्र ठरविण्याची मागणी सुनील फंड यांनी केली असून याची सुनावणी आज जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे समोर सुरू झाली आहे.यात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याना उपस्थित ठेवण्यासाठी दुसरी सुनावणी आगामी २२ मार्च रोजी ठेवली असल्याची माहिती अड्.विद्यासागर शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

तक्रारदार सुनील फंड यांच्या वतीने अड्.विद्यासागर शिंदे यांनी पुढील सुनावणीच्या वेळी तत्कालीन मुख्याधिकारी डोईफोडे यांच्यासह उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांनी उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली होती.दोन्ही बाजूंचे म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेवून त्याबाबत अंतिम सुनावणी २२ मार्च रोजी होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सांगितले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेचे उपकार्यकारी अधिकारी सुनील गोर्डे यांनी शासनाच्या नियमानुसार कोपरगाव शहरातील पूनम चित्रपटगृहासमोरील अतिक्रमणे दि.२२ जुलै २०२१ रोजी त्याचे चलचित्रण करत काढली होती.त्यात त्यांनी त्या अतिक्रमणात शिवसेना प्रमुख यांचे छायाचित्र असल्याचा कांगावा केला होता.मात्र तो तत्कालीन उपमुख्याधिकारी गोर्डे यांनी सप्रमाण खोटा ठरवला होता.त्याचा राग धरून माजी आ.कोल्हे समर्थक सेनेचे माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांनी उपकार्यकारी अधिकारी गोर्डे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली होती व कोपरगाव नगरपरिषदेचे कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.त्याबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा नगर पंचायत व औद्योगिक नगरी १९६५ चे कलम ४४ नुसार कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र तत्कालीन उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायत व औद्योगिक नगरी १९६५ चे कलम ४४ वर नाराज होवून या असामाजिक तत्वांना चाप बसावा यासाठी माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल व नगरसेवक कैलास जाधव यांच्यावर सात वर्षासाठी अपात्रतेची कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना येथील कार्यकर्ते सुनील फंड यांनी दिले होते.

दरम्यान त्या बाबत कार्यवाही सुरु झाली असून सुनील फंड याना नुकतेच जिल्हाधिकारी यांनी त्यांना कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचे मार्फत नोटीस पाठवली होती त्याची सुनावणी आज ०३ मार्च रोजी दुपारी ०१ वाजता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या दालनात संपन्न झाली आहे.
सुनील फंड यांच्यावतीने अॅड.विद्यासागर शिंदे यांनी बाजू मांडली आहे.तत्कालीन मुख्याधिकारी डोईफोडे यांच्या आदेशानुसार सदर अतिक्रमण काढले असल्याचे अॅड.शिंदे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.पुढील सुनावणीच्या वेळी तत्कालीन मुख्याधिकारी डोईफोडे यांच्यासह उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांनी उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली होती.दोन्ही बाजूंचे म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेवून त्याबाबत अंतिम सुनावणी २२ मार्च रोजी होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सांगितले आहे.अॅड. शिंदे यांची मुख्याधिकारी डोईफोडे यांच्यासह उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांना उपस्थित राहण्याबाबत केलेली विनंती मान्य करून २२ मार्च रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे तत्कालीन अधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.त्यामुळे येत्या २२ मार्च रोजी काय कारवाई होणार याकडे आगामी नगरपरीषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काय कारवाई होणार ? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close