शैक्षणिक
शासकीय आदर्श आश्रम शाळेच्या निकालात यांची बाजी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
या वर्षी मार्च महिन्यात संपन्न झालेल्या शालांत परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून यात अकोले तालुक्यातील शासकीय आदर्श आश्रमशाळा भंडारदरा कॅम्प मवेशी या शाळेने आपल्या १०० % निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.यात एकुण ३१ विद्यार्थ्यांपैकी १० विदयार्थी विशेष श्रेणीमध्ये,२१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत.यात कु.कातडे प्रतीक्षा ८६% गुण मिळवून प्रथम क्रमांक तर हिने कु.वासले तेजश्री व कु.कामडी अनिता हिने प्रत्येकी ८३.६०% गुण मिळवून समान द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तर गिऱ्हे सागर वसंत याने ८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शैक्षणिक संकुल मवेशी येथील महाराष्ट्रातील नाशिक विभागातील पाच जिल्ह्यातून आश्रम शाळेतून स्पर्धा परिक्षेव्दारे निवडलेल्या चाळीस विद्यार्थ्यांना या शाळेत इ.५ वी ला प्रवेश दिला जातो.आदिवासी विद्यार्थ्यांतून प्रज्ञावंत विद्यार्थी निर्माण होऊन डाॅक्टर,इंजिनिअर व प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हावेत या उद्देशाने १९८९ सालापासून विद्यानिकेतनच्या धर्तीवर आदश॔ आश्रम शाळा भंडारदरा कॅप मवेशी ही शाळा सुरू करण्यात आलेली आहे.
आदिवासी विकास विभागा मार्फत चालवल्या जाणाऱ्या या शाळांची या वर्षी २५ वी बॅच होती .गेले पंचवीस वर्षाच्या कालखंडात या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी वैद्यकीय अधिकारी,शास्त्रज्ञ,पोलिस अधिकारी,हवामान शास्त्रज्ञ,शिक्षक,कृषी शास्त्रज्ञ,शेतीतज्ञ,आर.टी.ओ,डाॅक्टर,इंजिनिअर,प्रशासकीय सेवेत वर्ग एक व दोन पदावर अधिकारी म्हणून सेवा देत असून महाराष्ट्रातील ३७ आदिवासीतील जनजातीचे प्रतिनिधीत्व करत असून महाराष्ट्र व भारतीय प्रशासकीय सेवेत आपले योगदान देत आहेत.या शाळेमुळे आदिवासीतील मागस जनजातीचा शैक्षणिक मागासलेपणा कमी होण्यास मदत झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्याचे प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे,तसेच शाळेचे कुलप्रमुख भाऊसाहेब खरसे व आदिनाथ सुतार,शिवाजी नरके,सुमन सहाणे,अंकुश चावडे,जगनाथ जाधव, इ. शिक्षक वृद तसेच शाळेचे अधीक्षक समाधान सुर्यवंशी,अधिक्षिका रंजना जगधने,अतिथी शिक्षक,स्वप्नील सोनवणे,नामदेव डगळे,प्रसाद पिचड,गृहपाल सुधीर सांगळे,अनिल जोशी, शिक्षक आदींनी यशस्वी विद्यार्थीचे अभिनंदन केले आहे.