जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

नवोदयसाठी ..या विद्यालयाच्या ७ विद्यार्थ्यांची निवड!

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय व केंदीय माध्यमिक षिक्षण मंडळ नवी दिल्ली आयोजित जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांची निवड नवोदय विद्यालयासाठी झाली आहे. यामध्ये भाग्यश्री सोनवणे, दिक्षा गावित, दुर्गेश चव्हाण,करण चौधरी,गौरव पाटील,निखील गायकवाड,तन्मय इंगळे यांचा समावेश आहे.

यावेळी प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले की,जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याना केंद्र सरकार मार्फत सी.बी.एस.ई. अभ्यासक्रमाचे इयत्ता वी ते १२ वी पर्यंतचे वसतीगृहयुक्त शिक्षण मोफत दिले जाते. त्यासाठी प्रत्येक जिल्हयात एक नवोदय विद्यालय असून इयत्ता वी चे विद्यार्थी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा देऊ शकतात. त्यातून ८० प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते.आजपर्यंत आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलाच्या ६८ विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. संपूर्ण राज्यात एका षाळेचे सर्वाधिक विद्यार्थी निवडले जाण्याचा मान आत्मा मालिकने मिळविला आहे.

या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे,विभाग प्रमुख सागर अहिरे,सचिन डांगे,पर्यवेक्षक अनिल सोनवणे,विषय शिक्षक दिपक चौधरी,कोमल जगताप,प्रियंका चौधरी यांचे मागदर्शन लाभले होते.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आत्मा मालिक माऊली,ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रभाकर जमधडे,प्रकाश भट,बाळासाहेब गोर्डे,प्रकाश गिरमे,माधवराव देशमुख,व्यवस्थापक हिरामण कोल्हे,सर्व विभाग प्रमुख,पर्यवेक्षक, शिक्षकवृंद आदिनी अभिनंदन केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close