जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

श्री सद्गुरू गंगागिरी महाविद्यालयाचा निकाल ९८.४२ टक्के

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्या मध्ये कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी यंदाही लक्षवेधी यशाची परंपरा कायम राखली असून याही वर्षी इ. १२ वी सायन्सचा निकाल ९८.४२ % लागला असून,वाणिज्य विभागाचा निकाल ९१.३१ तर कला विभागाचा निकाल ७६.६३ % लागला आहे. विज्ञान शाखेतून उच्चतम गुणप्राप्त विद्यार्थी बोरनारे सार्थक अरुण,पवार जान्हवी प्रमोद व तासकर ऋषिकेश राजेंद्र यांना ८७.६९ % गुण मिळवुन ते महाविद्यालयात प्रथम आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


यात द्वितीय क्रमांक भाकरे संध्या बाबासाहेब हिने मिळवून ८७.३८ % गुण प्राप्त केले आहेत तर कु.पवार प्रदयुम्न ज्ञानेश्वर यास ८५.५४ % गुण मिळवून तो महाविद्यालयात तृतीय आला आहे.

तसेच वाणिज्य विभागातील ३ गुणवंत विद्यार्थी क्रमशः प्रथम कु.आढाव प्रसन्ना सतीष ९०.६१ %, द्वितीय कु.खरोटे प्रांजल बाबासाहेब ८९.५३ %, सूर्यवंशी अक्षय राजेंद्र ८८.०० % गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय आलेले आहे.

कला विभागातील प्रथम तीन विद्यार्थी – कु. दुशिंग तनुजा राजेंद्र ८१.८४ %, द्वितीय कु. केदार अमोल शरद ८०.४६ % तृतीय क्रमांक गायकवाड इंद्रायणी भिमा ७८.३० % गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ६७.३९ % लागला असून कु. वाणी सिध्दांत संतोष ७०.४६ %, मोरे संकेत जगदीश ६८.०० % व आढाव प्रशांत सुनिल ५७.८४ % गुण मिळवुन हे आपापल्या विभागात प्रथम आलेले आहेत.

महाविद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष,व सर्व सन्मानीय सदस्य,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. थोपटे,सर्व सहकारी प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर सेवक, यांनी सर्व गुणवंत विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close