ग्रामविकास

गोदावरीवर तीस कोटींचा पुल उभारणार -…यांचे आश्वासन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

     कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागातील सुरेगाव आणि सांगवी भुसार या दोन गावांसह दोन्ही बाजूच्या अनेक गावांना जोडण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या पुलास सरकारकडून आगामी काळात आपण सुमारे पंचवीस ते तीस कोटी रुपयांचा निधी लवकरच मंजूर करू अशा आशावाद आ.आशुतोष काळे यांनी सुरेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.

  

  “राज्य मार्ग ०७ देर्डे फाटा ते भरवस फाटा तालुका हद्द या रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे काही अडचणी येतील परंतु ज्यावेळी हा रस्ता पूर्ण होईल त्यावेळी भविष्यात हा रस्ता कित्येक दिवस करावा लागणार नाही असे भक्कम काम सुरु आहे.कोळपेवाडी-कोपरगाव या महत्वाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे हा रस्ता देखील सिमेंट कॉंक्रीटचा करावा लागणार आहे’-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

   कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे ०१ कोटी ५० लाख रुपये निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी या विकास कामांमध्ये तलाठी कार्यालय व निकमनगर रस्ता खडीकरण कामाचे लोकार्पण तसेच दशक्रिया विधी शेड बनवणे,मोतीनगर स्मशानभूमी रस्ता करणे व स्मशानभूमी सुशोभीकरण करणे (टप्पा १ व २) आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यांचे भूमिपूजन करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी श्री गोवर्धनगिरी महाराज,शिवाजीराव वाबळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे,सुरेगावच्या सरपंच सुमन कोळपे,उपसरपंच सीमा कदम,तंटामुक्ती अध्यक्ष वाल्मिक कोळपे,माजी संचालक राजेंद्र मेहेरखांब,गौतम बँकेचे संचालक राजेंद्र ढोमसे,शरदचंद्र पवार पतसंस्थेचे संचालक ज्ञानेश्वर हाळनोर,सुदाम वाबळे,गौतम कुक्कुट पालनचे संचालक सुशिल बोरावके,माजी सरपंच शशिकांत वाबळे,यशवंत निकम,अंबादास धनगर,डॉ.आय.के.सय्यद,प्रशांत वाबळे,माजी उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोर,नामदेव कोळपे,सुहास वाबळे,भागवत कदम,सिद्धार्थ मेहेरखांब,पांडुरंग ढोमसे,श्रीधर कदम,हेमंत वाबळे,गणपत गोरे,मोतीराम निकम,अरुण लोंढे,रवींद्र देवकर,संजय ढोणे,माणिक उगले आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.                      

   यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”स्व.कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने नेहमीच सुरेगावच्या विकास कामांना  मदत केली आहे. २०१९ पूर्वी कोपरगाव शहराला २१ दिवसाआड पाणी येत होते परंतु पाच नंबर साठवण तलाव पूर्ण झाल्यामुळे चार दिवसाआड पाणी येते त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगावकरांनी आपल्याला  मतदान देतांना राज्यात क्रमांक पाचचे उंचांकी मतदान मिळाले यामध्ये सुरेगावचा पण मोठा वाटा आहे.सुरेगावकरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी विकास कामांना जास्तीत जास्त निधी कसा देता येईल हा माझा नेहमी प्रयत्न असतो.सुरेगावला एक स्मशानभूमी आहे परंतु गावाचा मोठा विस्तार असल्यामुळे दुसऱ्या स्मशानभूमीची नागरिकांची मागणी होती ती मागणी पूर्ण केली.जलजीवन योजनेच्या कामातून तलावाचे काम होणे गरजेचे आहे त्यासाठी अधिकचा निधी आवश्यक असून त्या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे. नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे त्याला सुरेगाव देखील अपवाद नाही त्यामुळे सातत्याने गटारीच्या पाण्याची अडचण निर्माण होते त्यामुळे या गटारीच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे हि काळाची गरज आहे.कोपरगाव शहराला भूमिगत गटारीसाठी निधी आणला आहे त्याप्रमाणे सुरेगाव, कोळपेवाडी,कोळगाव थडी,शहाजापूर या गावांच्या भूमिगत गटारीचा प्रश्न एकत्रितपणे मार्गी लावून हे सर्व पाणी एका ठिकाणी आणून शेतीसाठी वापरता येईल का? हि नागरिकांची मागणी नसली तरी हा प्रकल्प यशस्वी करता येईल का? याची चाचपणी करू.सुरेगावच्या विकासासाठी जिल्हा परिषद,राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी दिला व यापुढे पण देवू.हे त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगत आ.काळे यांनी सुरेगावसह पंचक्रोशीतील गावांच्या विकासाचा मास्टर प्लॅन यावेळी उपस्थित नागरीकांपुढे मांडला त्यावेळी त्याचे त्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close