जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या कारखान्याने सुरू केली साखर शाळा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी) 

   कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीप हंगाम सुरु झाला असून त्यासाठी ऊस तोडणी कामगार कारखाना कार्यस्थळावर दाखल झाले आहे.या ऊस तोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी कारखान्याने त्यांच्यासाठी साखर शाळा सुरु केली आहे.या शाळेचे उद्घाटन कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका गटशिक्षण अधिकारी पिंकी वाजे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडली आहे.

 

  “ऊस तोडणी कामगारांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवून त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांना कारखान्याच्या वतीने शैक्षणिक साहित्यांचे व फळांचे वाटप करण्यात आले.या विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार देण्यात येणार असून या मुलांना हसत-खेळत शिक्षण मिळावे यासाठी श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयाच्या प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे”- सोमनाथ बोरनारे,कार्यकारी संचालक,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना,गौतमनगर.

    महाराष्ट्रात साखरेचा गळीत हंगाम सुरू झाल्यावर बीड,धाराशिव (उस्मानाबाद),अहिल्यानगर अशा दुष्काळी भागातून कामगार ऊस तोडणीसाठी इतर जिल्ह्यांत स्थलांतर करतात.त्यांच्या लहान मुलांची शाळा खंडित होऊ नये म्हणून १९९४ पासून ‘साखरशाळा’ हा हंगामी शाळांचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.त्यासाठी कारखाना कार्यस्थळ आणि कामाच्या ठिकाणी या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे यंदाच्या गाळप हंगामात या मुलांसाठी कारखाना कार्यस्थळावरील श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयाच्या माध्यमातून खुली केली आहेत.ऊस तोडणी कामगारांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवून त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांना कारखान्याच्या वतीने शैक्षणिक साहित्यांचे व फळांचे वाटप करण्यात आले.या विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार देण्यात येणार असून या मुलांना हसत-खेळत शिक्षण मिळावे यासाठी श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयाच्या प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून हंगाम संपेपर्यंत त्यांचा शैक्षणिक प्रवाह खंडित होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

  सदर प्रसंगी कारखान्याचे सहसचिव संदीप शिरसाठ,मुख्य लेखापाल वैभव काळे,शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे,ऊस विकास अधिकारी भाऊसाहेब चिने,सुरक्षा अधिकारी राजेंद्र धुमाळ, तसेच विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी व कर्मचारी,तालुका केंद्र प्रमुख,विस्तार अधिकारी,ऊस तोडणी मजूर,स्थानिक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   याप्रसंगी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी सांगितले की,”कर्मवीर शंकरराव काळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शेतकरी,कष्टकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यासाठी शिक्षण हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयात साखर शाळा सुरु केली असून कारखाना व्यवस्थापन त्याकडे बारकाईने लक्ष देणार असल्याचे सांगितले.

  यावेळी गटशिक्षण अधिकारी पिंकी वाजे यांनी,”स्थलांतरित ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने साखर शाळा सुरु केली आहे.शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार असून शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.या साखर शाळेमुळे या मुलांचा भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल होईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांनी केले तर आभार श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र शिंदे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close