शैक्षणिक
विद्यार्थ्यांकडे व्यावसायिक कौशल्ये असणे ही काळाची गरज-ॲड.पुंड

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित युगात केवळ पदवी किंवा पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांकडे व्यावसायिक कौशल्ये असणे ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन साईजेन एज्युकेशन अँड रिसर्च प्रा.ली.चे संचालक ॲड.एस.पी.पुंड यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय व साईजेन एज्युकेशन अँड रिसर्च प्रा.ली.यांचें संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात टॅली प्राईम विथ जी.एस. टी.कोर्सचा कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे हे होते.
सदर प्रसंगी साईजेन एज्युकेशन अँड रिसर्च प्रा.ली.चे संचालक ॲड.एस.पी.पुंड,महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बाळासाहेब सोनवणे,वाणिज्य विभागप्रमुख प्रा.गणेश जेजुरकर,विज्ञान विभागप्रमुख प्रा.श्रीमती सुनीता बालवे,तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी ॲड.पुंड यांनी यामध्ये टॅली प्राईम सॉफ्टवेअरचा वापर,अकाउंटिंग एन्ट्रीज,लेजर तयार करणे,व्हाउचर एन्ट्री,जी.एस.टी.बिलिंग,आर्थिक व्यवहारांची नोंद तसेच विविध आर्थिक अहवाल तयार करण्याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतील सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यावसायिक क्षेत्रात उपयोग कसा करावा,याची माहिती दिली आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक उपप्राचार्य बाळासाहेब सोनवणे केले आहे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मयुरी भोसले व प्रा.ज्योती लोगाणी यांनी केले,तर उपस्थितांचे आभार प्रा. अभिजीत वाघ यांनी मानले आहे.



