जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या ठिकाणी होणार बाल संस्कार शिबिर !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकामठाण हद्दीत नगर मनमाड महामार्गालगत जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या वतीने आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात आगामी उन्हाळी सुट्टीत उन्हाळी बाल संस्कार शिबिर आयोजित केला जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त हनुमंतराव भोंगळे यांनी दिली आहे.

  

“बाल संस्कार शिबिराचे उद्दिष्ट मुलांना सर्वोत्तम गोष्टी आत्मसात करून देणे आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक घडविणे हे आहे.मुलांना मानवी मूल्ये रुजवून देणे,त्यांना मोठी स्वप्ने पाहायला शिकवणे,त्यांना मानवी उत्कर्षाकडे घेऊन जाणे,मुलांना सर्वोत्तम गोष्टीच आत्मसात करता येतील असे वातावरण निर्माण करणे,तरुण मनांना घडवून जागतिक शांतता प्राप्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आहे”- नंदकुमार सुर्यवंशी,अध्यक्ष,जंगली महाराज आश्रम ट्रस्ट,कोकमठाण.

   मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी उत्तम सवयी आवश्यक आहेत आणि उत्तम सवयींसाठी उत्तम संस्कार.म्हणूनच आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण आपल्यासाठी घेऊन आले आहे आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर.२० एप्रिल ते १०मे २०२५ या सुट्टीच्या काळात निवासी संस्कार शिबिराचे आयोजन आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल तर्फे आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल,शिर्डी-कोपरगाव रोड,कोकमठाण,ता. कोपरगाव येथे करण्यात आले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

     सदर उपक्रम हा आत्मा मालिक माऊलींच्या कृपाआशीर्वादातून आणि संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून संस्कार मुल्यांचा खजिना वय वर्ष ६ ते १५ किंवा इयत्ता पहिली ते आठवी या वयोगटातील मुला मुलींसाठी खुला होत आहे.मराठी,हिंदी व इंग्रजी भाषिक संपूर्ण भारतातील मुलामुलींसाठी शिबिर प्रवेश उपलब्ध आहे.आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुला मार्फत शिबिरार्थींना अनेक प्रकारच्या सोई सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

    या निवासी बालसंस्कार शिबिरात विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे.यात देशभरातील नावाजलेल्या मान्यवरांचे संस्कार व्याख्याने,बालचित्रपट महोत्सव, शिवव्याख्यान,बालकीर्तनकरांचे कीर्तन,आत्मा मालिक संत परिवार ध्यान योगा बालसंस्कार मार्गदर्शन.विद्यार्थ्यांचे कला,क्रीडा,नृत्य,नाट्य,संगीत,अभिनय,स्पर्धा परीक्षा या सर्वांगीण क्षेत्रामध्ये कौशल्य वृद्धिंगत करण्याचे काम या संस्कार शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

  या शिबिराच्या सविस्तर माहितीसाठी पुढील  https://bal-sanskar-shibir.atmamalik.in/ या वेब साईट ला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मुख्य शिबिरासाठी नावनोंदणी करण्यासाठी फॉर्म  https://bit.ly/shibirform तर क्रिकेट शिबिर साठी नावनोंदणी करण्यासाठी फॉर्म https://bit.ly/cricket-shibir या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.या उपक्रमाचे पालक वर्गात सर्वत्र स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close