जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या ‘न्यू इंग्लिश स्कूल’चा निकाल जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल काकडी या विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांत कु.मोहिनी धनराज सोनवणे या विद्यार्थिनीने शे.८३% गुण मिळवून विद्यालयात प्रथम कु.साईशा कैलास डांगे हिने ८२.६०% गुण मिळवून द्वितीय तर कु.प्रिया धोंडीराम सोनवणे हिने ८०% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळविला आहे.

   कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल काकडी या विद्यालयाचे एकूण ४३ विद्यार्थी मार्च २०२४ मध्ये एस.एस.सी.परीक्षेला बसले होते.हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होवून कु.मोहिनी धनराज सोनवणे या विद्यार्थिनीने शे.८३% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला असून कु.साईशा कैलास डांगे हिने ८२.६०% गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर कु. प्रिया धोंडीराम सोनवणे हिने ८०% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळविला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजीआ.अशोक काळे,विश्वस्त आ.आशुतोष काळे,व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड,सचिव चैताली काळे, सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य तसेच मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक,विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.



जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close