जाहिरात-9423439946
शैक्षणिक

   …या शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत गरुड भरारी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  
    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या वर्ग पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात कोपरगाव तालुक्यातील जवळके जिल्हा परिषद शाळेचे २८ पैकी २५ विद्यार्थी पात्र झाले असून या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून या साठी ज्या शिक्षकांनी मेहनत घेतली आहे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  

  “पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) पास झाल्यानंतरच्या वर्षांपासून ३ वर्ष व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) पास झाल्यानंतरच्या वर्षांपासून २ वर्ष शिष्यवृत्ती चालू राहणार आहे”-दत्तात्रय मैड,मुख्याध्यापक,जवळके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.

  

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या वर्ग पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात कोपरगाव तालुक्यातील जवळके जिल्हा परिषद शाळेचे २८ पैकी २५ विद्यार्थी पात्र झाले त्यांचे समवेत वर्गशिक्षक निवृत्ती बढे गुरुजी दिसत आहे.

प्राथमिक व माध्यमिक शाळांतील गुणवान विद्यार्थ्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन १९५४-५५ पासून कार्यान्वित आहे.सदर शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षण अधिकार या कायद्यामधील तरतूदी लक्षात घेवून दि.२९ जून २०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यात कार्यान्वित असलेल्या शिष्यवृत्तीचा स्तर इयत्ता ४ थी ऐवजी इयत्ता ५ वी व इयत्ता ७ वी ऐवजी इयत्ता ८ वी असा करण्यात आला आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) पास झाल्यानंतरच्या वर्षांपासून ३ वर्ष व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) पास झाल्यानंतरच्या वर्षांपासून २ वर्ष शिष्यवृत्ती चालू राहणार आहे.

   पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्पृहणीय यश संपादन करुन राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविणा-या विद्यार्थ्‍यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा सत्कार समारंभ संबंधित जिल्हयाचे पालकमंत्री यांचे हस्ते दरवर्षी विद्यार्थ्‍यांची संख्या विचारात घेऊन दि.१५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर अथवा त्याच दिवशी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करुन करण्यात येण्याची तरतूद असल्याने या वर्षी जवळके येथील शाळेचे विक्रमी विद्यार्थी यशस्वी झाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  दरम्यान या यशस्वी विद्यार्थ्यांना ३०० पैकी मिळालेले गुण पुढे दर्शवले आहे.ऋत्वि गणेश थोरात-२५६,समीक्षा दादासाहेब नेहे-२४८,शिवम अरुण थोरात-२४८,अदिती प्रकाश थोरात-२४४,सबुरी विनायक थोरात-२३८,साक्षी दत्तात्रय थोरात-२३८,कृष्णा किशोर नेहे-२२०,आयुष राजेंद्र नेहे-२२०,आयुष दिलीप शिंदे-२१६,वैष्णवी बाळासाहेब नेहे-२०८,आराध्य विजय वाणी-२०८,प्रथमेश संदीप थोरात-२०२,अक्षदा गोरक्ष काकडे-२००,स्तवन स्वामी पाडेकर-२००,श्रावणी तुळशीराम बोडखे,१९२,तेजस्विनी सुभाष थोरात-१९०,साईशा अनिल थोरात-१८४,ईश्वरी भाऊसाहेब जडे-१७८,उन्नती रवींद्र गोसावी-१७६,अंजनी अशोक शेटे-१७२,ज्ञानेश्वर बाळासाहेब वाकचौरे-१६६,तन्मय महेश थोरात-१६६,ईश्वरी सुनील थोरात-१५६,तनुजा अरुण पोकळे-१५२,साई जालिंदर थोरात-१३२ आदींचा समावेश आहे.

    दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय मैड,शिक्षक सुधाकर अंबिलवादे,निवृत्ती बढे,रुक्मिणी अंधारे,सुरेखा उगले,रवींद्र गोसावी,कोमल बागुल आदींचे मार्गदर्शन लाभले होते त्यांचे सर्वत्र कौतुख होत आहे.

   दरम्यान या यशस्वी विद्यार्थ्यांचे निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,जलसंपदाचे माजी उपअभियंता एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,बाबुराव थोरात,लक्ष्मण थोरात,जेष्ठ कार्यकर्ते उत्तमराव थोरात,विश्वनाथ थोरात,बाळासाहेब थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात,गोरक्षनाथ थोरात,नवनाथ पन्हाळे,बापूसाहेब थोरात,तालुका शिक्षणाधिकारी शबाना शेख,जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात,उपसरपंच सुनील थोरात,सदस्य भाऊसाहेब थोरात,मिनाबाई विठ्ठल थोरात,वनिता रखमा वाकचौरे,इंदूबाई नवनाथ शिंदे,सोमनाथ थोरात,रोहिणी गोरक्षनाथ वाकचौरे,गोरक्षनाथ शिंदे,अरुण थोरात,गणेश थोरात,विजय शिंदे,नवनाथ थोरात,रामनाथ थोरात,शिक्षण समितीचे अध्यक्ष संदीप थोरात,सर्व समिती सदस्य,आदींनी आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close