जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

फावड्याने मारहाण,पाच जणांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील रहिवासी असलेली महिला ही विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेली असता,”ती चालू करू नको” म्हणून तीस हरकत घेऊन आरोपी नंदकिशोर ज्ञानदेव लांडगे याने तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आपण पती म्हणून भांडण सोडविण्यास गेलो असता आरोपीने आपल्यालाही पावड्याच्या दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याचा गुन्हा फिर्यादी राजेंद्र ज्ञानदेव लांडगे (वय-५१) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे माहेगाव देशमुखसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

  

दि.०८ एप्रिल रोजी दुपारी ०१ वाजेच्या सुमारास फिर्यादी इसम राजेंद्र लांडगे यांची पत्नी आशा लांडगे ही विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेली असता त्यास आरोपी नंदकिशोर लांडगे यांनी त्यास हरकत घेतली होती.व तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.सदर भांडण सोडण्यास तिचा पती गेला असता त्यासही मारहाण केली आहे.

  वर्तमानात कोपरगाव तालुक्याचे इंग्रजांनी निर्माण केलेले शेती सिंचनाचे पाणी गेल्यात जमा झाले आहे.तरीही शेतकरी जागे होण्याची शक्यता दिसत नाही.याबाबत राज्यकर्त्यांना जाब विचारणे गरजेचे झाले असताना शेतकरी आहे त्या पाण्यावरून भांडणे करून आपआपसात वैर निर्माण करत असल्याच्या घटना उघडकीस येत आहे.अशीच घटना नुकतीच माहेगाव देशमुख येथे उघडकीस आली आहे.यातील फिर्यादी हे वरील गावचे रहिवासी असून त्यांची  व आरोपी यांची एकत्रीत विहीर असून ते आळीपाळीने विहीरिवरील मोटार सुरू करत असतात.दि.०८ एप्रिल रोजी दुपारी ०१ वाजेच्या सुमारास फिर्यादी इसम राजेंद्र लांडगे यांची पत्नी आशा लांडगे ही विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेली असता त्यास आरोपी नंदकिशोर लांडगे यांनी त्यास हरकत घेतली होती.व तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.दरम्यान महिलेचा पती व फिर्यादी इसम राजेंद्र लांडगे हे वाद सोडविण्यासाठी गेले असता आरोपी नंदकिशोर लांडगे याने त्यांनाही शिवीगाळ करून पावड्याच्या दांड्याने डोक्यास व करंगळीस मारहाण करून गंभीर जखमी केले होते.

  दरम्यान आरोपी कविता नंदकिशोर लांडगे,उत्तम परशराम थेटे,भाचा संदीप उत्तम थेटे,रा.पालखेड ता.निफाड आदिनीही गैरकायद्याची मंडळी जमा करून वाईटसाईट शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.दरम्यान जखमी यांना रुग्णालयात उपचार केल्यानंतर हा गुन्हा उशिराने नुकताच दाखल केला आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद क्र.१९४/२०२४ भा.द.वि.कलम १४३,१४७,३२४,३२३,१४८,१४९,५०४,५०६,म.पो.कायदा कलम ३७,(१) (३) १३५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचेसह पोलीस हे.कॉ.दहिफळे यांनी भेट दिली आहे.दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.दहिफळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close