जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या रंगभरण स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   भोसरी येथील साई कला आविष्कार नाट्य संस्था व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुप,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी वर्गात चित्रकलेची आवड निर्माण व्हावी या साठी दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न होते.या तेराव्या वर्षी चंद्रयान -३ या विषयावर ही रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती त्यात सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

  

यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.त्यात प्रथम क्रमांक प्रकाश मौर्य-रत्नागिरी,द्वितीय क्रमांक वैभव पाटील-नवी मुंबई,तृतीय क्रमांक तेजस कासार-चिपळूण यांनी यश संपादन केले आहे.

   चंद्रयान-३ ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) तिसरी चंद्र शोध मोहीम होती.यात चांद्रयान-२ प्रमाणेच लँडर आणि रोव्हर होता,परंतु ऑर्बिटर नव्हते.ह्याचे प्रोपल्शन मॉड्यूल हे कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखे वागले होते. अंतराळयान हे १०० किमी चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रोपल्शन मॉड्यूल हे लँडर आणि रोव्हर घेऊन गेले.या चंद्रयानाबाबत विद्यार्थ्यांत आवड निर्माण व्हावी यासाठी या रंगभरण स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अशोक नगरकर हे होते.

  

  सदर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक बसवराज कल्लोळी,टाटाचे माजी व्यवस्थापक रमाकांत आडके,मराठी विभाग प्रमुख महात्मा फुले महाविद्यालय प्राध्यापक डॉ.प्रा.पांडुरंग भोसले,मॉर्डन महाविद्यालय पुणे प्रा.डॉ.रुपेश बनसोडे,जयहिंद इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य डॉ.किरण पैठणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

  सदर प्रसंगी संस्थेच्या वतीने प्रत्येक सहभागीना विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देण्यात आले आहे.तसेच शाळेचे मुख्याध्यापक,मुख्याध्यापिका,कलाशिक्षक,कलाशिक्षिका आदींना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.तीन विजयी विद्यार्थी घोषित करण्यात आले आहे.विजयी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र,सुवर्ण,रजत,व कांस्य पदक देऊन गौरवण्यात आले आहे.

  यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.त्यात प्रथम क्रमांक प्रकाश मौर्य-रत्नागिरी,द्वितीय क्रमांक वैभव पाटील-नवी मुंबई,तृतीय क्रमांक तेजस कासार-चिपळूण यांनी यश संपादन केले.त्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र बुक देऊन सन्मानित करण्यात आले.

सदर उपक्रमात सहभागी शाळेला राज्यस्तरीय,’उत्कृष्ट सहभाग दौलत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. त्यात जयहिंद इंटरनॅशनल स्कूल कुरण,जुन्नर,स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,उरुळी कांचन,मातोश्री पार्वताबाई कुंभार प्राथमिक शाळा,दौंड.एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल,भोसरी यांना सन्मानित करण्यात आले आहे.

  सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक साई कला आविष्कार नाट्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी यशवंत घोडे यांनी केले तर  उपस्थितांचे आभार विकास राऊत यांनी मानले आहे.

  सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद मुळक,साईराजे सोनवणे,बबन चव्हाण,यशवंत घोडे,यशवंत गायकवाड यांनी प्रयत्न केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close