शैक्षणिक
जि.प.शाळेला साऊंड सिस्टम भेट,विद्यार्थ्यांत समाधान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील काकडी (विमानतळ) येथे नवीनच बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला काल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कानिफनाथ गुंजाळ यांनी साऊंड सिस्टिम भेट दिली आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर कार्यक्रमा प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका संध्याताई वाकचौरे मॅडम,सरपंच पूर्वाताई रवींद्र गुंजाळ,शाळेय समितीच्या अध्यक्ष नीलमताई राजेंद्र भालेराव,उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे,पोलीस पाटील,मधुकरराव गुंजाळ,मेजर शिंदे,श्री घुसळे सर,साबळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी शरद सोनवणे यांच्याकडे सदर साऊंड सिस्टिम सुपूर्द केली आहे.