शैक्षणिक
सोमैय्या महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध-प्राचार्य.यादव
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील के.जे.सोमैय्या महाविद्यालयाचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत असून येथे प्रवेशित विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी व ध्येयपूर्तीसाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे प्रातिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“या सात दिवसीय विद्यार्थी उद्बोधन वर्गात स्पर्धा परीक्षा विभाग,प्लेसमेंट सेल,क्रिडा विभाग,एन.एस.एस.,एन.सी.सी.,विद्यार्थी विकास मंडळ,ग्रंथालय विभाग,शिष्यवृत्ती विभाग,सांस्कृतिक विभाग,वादविवाद व वाड:मय मंडळ,विद्यार्थी तक्रार निवारण विभाग इत्यादी विविध विभाग व उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे”-डॉ.आर.ए.जाधव,विभाग प्रमुख,स्टूडेंट मेंटोरिंग.
कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे.सोमैय्या महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व स्टूडेंट मेंटोरिंग विभागाच्या वतीने दिक्षारंभ (विद्यार्थी उद्बोधन) वर्गाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते त्यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
सदर प्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.व्ही.सी.ठाणगे,वाणिज्य शाखाप्रमुख प्रा.एस.आर.पगारे,विज्ञान शाखाप्रमुख प्रा.बी.बी.भोसले,कला शाखाप्रमुख प्रा.के.एल.गिरमकर आदी प्रमुख मान्यवरासंह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
त्यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की,”या उद्बोधन वर्गामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित अभ्यासक्रमा व्यतिरिक्त महाविद्यालयात वर्षभर राबवित असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली आहे.ज्यामुळे विद्यार्थी वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होऊन आपले ध्येयनिश्चिती करू शकतात असे आश्वासन देऊन त्यांनी महाविद्यालयातुन शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान झालेल्या माजी विद्यार्थ्यांचाही गौवोद्गार केला आहे.
सदर प्रसंगी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.ठाणगे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,”महाविद्यालयीन जीवनाच्या प्रवासातून चांगला व सुसंस्कारित नागरिक घडत असतो. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना राबवित असलेल्या विविध उपक्रमांतून आपले ध्येय गाठले पाहिजे असे आवाहन केले आहे.
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा.एस.एल.अरगडे,डॉ.एस.बी.काळे,डॉ.एम.बी.खोसे,प्रा.एन.एस.पोटे आदींनी आदींनी परिश्रम केले आहे.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रथम वर्ष वर्गातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.