निधन वार्ता
साईनाथ वाकचौरे यांचे निधन

न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी व प्रगतशील शेतकरी संपतराव वाकचौरे यांचे चिरंजीव साईनाथ वाकचौरे (वय-२४) याचे पुणे येथे खाजगी कंपनीत सेवेत असताना काल रात्रीच्या सुमारास अपघाती निधन झाले आहे.त्याच्या पश्चात आई,वडील,दोन बहिणी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.साईनाथ वाकचौरे हा अत्यंत मनमिळाऊ व होतकरू तरुण म्हणून जवळके आणि परिसरात परिचित होता.
त्यांच्यावर जवळके येथील स्मशान भूमीत आज दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.