जयंती,पुण्यतिथी अभिवादन
कोपरगाव तालुक्यात…या गावी डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोपरगाव तालुक्यातील पढेगांव येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल १८९१ रोजी जन्म झाला.यंदा जयंतीनिमीत्त ठिकठिकाणी तयारी सुरू असून,देशाचे घटनाकार म्हणून भीमराव आंबेडकर अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहिलं जातं.
शुक्रवार दि.२१ रोजी सायंकाळी सात वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन भव्य मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर उपस्थितांसाठी मिष्टान्न भोजनाची पंगत देऊन रात्री भीमगितांचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी पढेगाव आणि परिसरातून मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.जयंतीसाठी सहायक फौजदार अमर गवसने पो.हेड.कॉ.प्रकाश नवाळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.या जयंती उत्सवासाठी गावातील पगारे,साळवे,धिवर परिवाराने अथक परिश्रम घेतले.