निधन वार्ता
रखमाबाई थोरात यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थेचे कार्यकर्ते राजेंद्र धोंडिबा थोरात यांच्या मातोश्री गं.भा.रखमाबाई धोंडिबा थोरात (वय-९०) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,तीन मुली सुना नातवंडे आदी परिवार आहे.

स्व.गं. भा.रखमाबाई थोरात या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या म्हणून परिसरात परिचित होत्या.त्यांच्यावर जवळके येथे स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.रखमाबाई थोरात या कोकण रेल्वेचे अभियंता रावसाहेब थोरात,व परशराम थोरात यांच्या मातोश्री होत्या.