गुन्हे विषयक
विविध चोरीतील चोरटे जेरबंद,कोपरगावातील घटना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात विविध दुचाकी व चार चाकी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्या आरोपींचा शहर पोलीस शोध घेत असताना त्यांना महेश अण्णासाहेब गायकवाड,निलेश दिलीप जाधव,दोन्ही रा.राहाता,किरण चंद्रकांत जाधव,सोमनाथ किसन वरशीळ दोघे रा.जेऊर कुंभारी आदी चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.याबाबत नागरिकांनी पोलिसांच्या या मोहिमेचे कौतुक केले असून त्यात अन्य तीन मोटारीसह गुन्हेगार पकडण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत असताना त्यांना शनी मंदिर रोड राहता येथील आरोपी महेश अण्णासाहेब गायकवाड,निलेश दिलीप जाधव व किरण चंद्रकांत जाधव,सोमनाथ किसन वरशीळ दोघे रा.जेऊर कुंभारी आदी चोरट्यांनीं हि चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.त्यामुळे सदर चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.त्यांच्याकडून आणखी एक गुन्हा लोणी पोलीस ठाण्यात (क्रं.१४०/२०२३)दाखल झाल्याचे उघड झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहरात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले होते.राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा चोरट्यांवर धाक राहिलेला दिसत नाही असा आरोप होऊ लागला होता.काही दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास नागरीक सामसूम झाल्यावर चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसरातून डॉ.जगदीश झंवर,सह्याद्री कॉलनी येथील लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर,आणि साईनगर या परिसरातून अड्.मनोज कडू यांची असे तब्बल एक-दोन नव्हे तर एक स्विफ्ट डिझायरसह दोन एर्टीगा अशा तीन कार चोरून आपला महा प्रताप दाखवला होता व पोलिसांना खुले आव्हान दिले होते.तर त्यानंतर सुभद्रानगर येथील पी.विल्यम एस.पी.चंदन या इसमाच्या घरातून सोन्याची साखळी व दोन अंगठ्या असा ०१ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला होता.तर आणखी दोन घटनेत कोपरगाव बस स्थानक येथून मुर्शतपुर येथील विशाल प्रकाश शिंदे यांची दुचाकी तर संजीवनी कारखाना पार्किंग मधून चांदेकासारे येथील कर्मचारी मच्छीन्द्र भाऊराव होन आदी दोन ठिकाणच्या अनुक्रमे २५ व १५ हजार असे ४० हजारांच्या दोन दुचाक्यांची चोरी केली होती.या अलीकडील काही काळातील घटना आहे.अन्य नोंदणी न झालेले अनेक गुन्हे असतील.त्यामुळे शहरात नागरिकांत वाहन चोरट्यांची भीती निर्माण झाली होती.
दरम्यान याच काळात आणखी १२ हजार रुपये किमतीची एक हिरो होंडा सी.डी.डॉन या दुचाकी (क्रं.एम.एच.४१ ७७०५) चोरीची घटना आणखी घडली होती.त्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात जेऊर कुंभारी येथील फिर्यादीचा गुन्हा क्रं.११९/२०२३भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे दाखल झाला होता.
या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत असताना त्यांना शनी मंदिर रोड राहता येथील आरोपी महेश अण्णासाहेब गायकवाड,निलेश दिलीप जाधव व किरण चंद्रकांत जाधव,सोमनाथ किसन वरशीळ दोघे रा.जेऊर कुंभारी आदी चोरट्यांनीं हि चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.त्यामुळे सदर चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.त्यांच्याकडून आणखी एक गुन्हा लोणी पोलीस ठाण्यात (क्रं.१४०/२०२३)दाखल झाल्याचे उघड झाले आहे.त्याच्याकडून सदर दुचाकीसह अन्य एक बजाज कंपनीची प्लॅटिना गाडीसह ०३ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी या मोहिमेत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते,संजय पवार,पो.हे.कॉ.किशोर जाधव,पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे,महेश गोडसे,पो.कॉ.गणेश थोरात,संभाजी शिंदे,गणेश काकडे,राम खारतोडे,यमनाजी सुंबे,महेश फड,आदींच्या पथकाने हि कौतुकास्पद कामगिरी केली आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.व नागरिकांनी अन्य वाहन चोरीतील चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी लेख परीक्षक दत्तात्रय खेमनर,डॉ.जगदीश झंवर,अड्.मनोज कडू,पी.विल्यम,विशाल शिंदे,मच्छीन्द्र होन आदींनी केली आहे.