धार्मिक
कोपरगाव बेट हे संजीवनी मंत्र प्रकट होण्याचे ठिकाण-रमेशगिरीजी महाराज

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव बेट हे पवित्र ठिकाण असून येथील सदगुरु शुक्राचार्य महाराज यांनी संजीवनी विद्या भगवान शिवाकडून त्यांनी कठोर तपश्चर्या करून ‘संजीवनी मंत्र’ प्राप्त केला,ज्याद्वारे ते युद्धातील मृत असुरांना पुन्हा जिवंत करत असल्याची माहिती कोपरगाव बेट येथील महंत रमेशगिरीजी महाराज यांनी आज सायंकाळी कोपरगाव बेट येथे बोलताना दिली आहे.

सदर प्रसंगी महंत रमेशगिरीजी व साधू महंतांचे वतीने शुक्राचार्य महाराज ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांचा या परिसर विकासासाठी मोठे योगदान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जगातील एकमेव असलेल्या शुक्राचार्य महाराज मंदिर श्री क्षेत्र कोपरगाव बेटाच्या पावन भूमीत संजीवनी पार,श्री गणेश मंदिर,श्री विष्णु मंदिर,श्रीमंत पवार सरकार यांचे श्रीमंत महादेव मंदिर व रोडे कुटुंबियांचे श्री दत्त मंदिर या संपूर्ण परिसराचे श्री शुक्राचार्य मंदिराच्या वतीने झालेले सुशोभिकरण व जीर्णोध्दार ट्रस्ट च्या वतीने व महंत रमेशगिरी महाराज यांचे हस्ते व महंत परमानंद महाराज,महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज,साधनानंदगिरी महाराज,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान यावेळी शुक्राचार्य ट्रस्टच्या वतीने या जीर्णोध्दार कार्यासाठी विशेष योगदान देणारे अभियंता,देणगीदार,शिल्पकार,कारागीर,रंगारी आदींचा शाल,श्रीफळ देऊन महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या वतीने करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,विश्वस्त हेमंत पटवर्धन,महेंद्र पाटील,सुशांत घोडके,विलास आव्हाड,नगरसेवक अनिल आव्हाड,दत्तात्रय सावंत,विनोद राक्षे,अभिजित आव्हाड,विजय रोडे,अर्जुन चव्हाण,भाऊसाहेब देशपांडे,विनामूल्य सेवा देणारे स्थापत्य अभियंता सुरेश आव्हाड,चंद्रशेखर भोंगळे,मंदिरास मदत देणारे भैयु ठोळे,शिल्पकार संतोष वंजारे,रामकेवल चौरसिया,मकरंद तांदळकर,सुनील पोरे,मधुकर साखरे,दिपक गोडले,आनंद ढोले,मुन्ना आव्हाड,भागचंद रुईकर,अतुल परदेशी,आकाश गीते,आनंदा आव्हाड,
आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शुक्राचार्य हे पौराणिक हिंदू धर्मातील असुरांचे गुरु,महान ऋषी भृगूंचे पुत्र आणि भगवान शिवाचे परम भक्त होते.संजीवनी विद्येचे (मृत व्यक्तीला जिवंत करण्याची कला) ते निपुण होते.शुक्र ग्रहाशी संबंधित हे आचार्य,वेदांचे ज्ञान आणि नीतीशास्त्रात निपुण होते.त्यांचे नीती शास्रावर अनेक ग्रंथ आहेत.त्यांचा पदस्पर्श या ठिकाणी झाला आहे.जनार्दन स्वामी महाराज यांचे आरतीत गुरु शुक्राचार्य यांचा विशेष उल्लेख असल्याची माहिती त्यांनी दिली व या ठिकाणच्या विकासासाठी या संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्या विकास दृष्टिकोनाचे कौतुक शेवटी केले आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी केले त्यावेळी त्यांनी आपण संजीवनी मंत्र देवयानी यांनी उच्चारला तो अष्टकोनी पार (ओटा) असून असल्याचे सांगून या ठिकाणी या ठिकाणी ३३ कोटी देव त्यावेळी उपस्थित होते.पवार सरकार,रोडे यांचेकडून परवानगी घेतली होती.या संजीवनी पाराचा खर्च देवस्थान ट्रस्टने केला असून या ठिकाणी गुरू शिष्य यांचा पुतळा उभारला जाणार आहे.याची वेळ निर्धारित करून ती कटाक्षाने जपली जाणार असल्याचे आवाहन शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी सूत्रसंचालन सुशांत घोडके यांनी केले त्यात पवार सरकार आणि त्यांची कोपरगाव येथील पवार सरकार यांचा इतिहास आणि कोपरगाव तालुक्यातील पवार सरकार यांनी बांधलेल्या महादेव मंदिरांची माहिती दिली आहे व श्रीमंत महादेव मंदिराचे काम लवकरच सूर करणार असल्याचे प्रतिपादन शेवटी केले आहे तर उपस्थितांचे आभार दत्तात्रय सावंत यांनी मानले आहे.



