जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

हॉटेलची लूट,कोपरगावात आरोपीवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरातील येवला रोडवर असलेल्या,’हॉटेल अशोका’मध्ये जाऊन तेथे असलेल्या बिअरच्या बाटल्या व तेथील गल्ल्यातील ०८ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली त्यास विरोध केला असता फिर्यादिस हाताचे फाईटने मारून जखमी केल्या प्रकरणी गांधीनगर येथील आरोपी मोद्या उर्फ सागर रामदास मंजुळ याचे विरुद्ध फिर्यादी दिपक उद्धवदास वासवणी (वय-५२) रा.बँक कॉलनी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

कोपरगाव येथील आरोपी मोद्या मंजुळ याने आपल्या काही साथीदारांना घेऊन तेथे प्रवेश केला व तेथे असलेल्या बिअरच्या बाटल्या मागितल्या होत्या.बिअरच्या बाटल्या देत असताना आरोपीने फिर्यादी हे आपल्या काउंटरवर तेथील गल्ल्यातील रक्कम मोजत असताना त्याने सुमारे ०८ हजार ५०० रुपयांची रक्कम हिसकावून घेतली त्यास विरोध केला असता मारहाण केली आहे.

  कोपरगाव शहरातील गांधीनगर,सुभाषनगर,गट क्रमांक १०५ मध्ये काही असामाजिक तत्त्वांनी आणि काही उपनगरात भुरट्यांनी उपद्रव वाढवला असून पोलिसांना त्याची डोकेदुखी वाढली आहे.अशीच घटना नुकतीच येवला रोडवर असलेल्या,’हॉटेल अशोका’ येथे रविवार दि.१९ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली असून यातील आरोपी मोद्या मंजुळ याने आपल्या काही साथीदारांना घेऊन तेथे प्रवेश केला होता व तेथे असलेल्या बिअरच्या बाटल्या मागितल्या होत्या.बिअरच्या बाटल्या देत असताना आरोपीने फिर्यादी हे आपल्या काउंटरवर तेथील गल्ल्यातील रक्कम मोजत असताना त्याने सुमारे ०८ हजार ५०० रुपयांची रक्कम हिसकावून घेतली आहे.त्यास फिर्यादीचे विरोध केला असता त्यांना त्याने आपल्या हाताने फाईट मारून जखमी केले आहे.जाताना त्याने तेथील चार बिअरच्या बाटल्या हिसकावून पोबारा करत असताना त्यास विरोध केला असता त्याने शिवीगाळ करून फिर्यादिस चापटीने मारहाण करून बिलाची रक्कम न देता निघून गेला आहे.
   दरम्यान घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट देऊन पाहणी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   दरम्यान या प्रकरणी फिर्यादी वासवणी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.२३६/२०२४ भा.द.वि.कलम ३२७,३२३,५०४,३४ प्रमाणे आरोपी व त्याचे सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close