जाहिरात-9423439946
निधन वार्ता

लहानुबाई भोसले यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातीलस संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी व के.जे.सोमय्या महाविद्यालयाचे प्रा.बापूसाहेब बाळनाथ भोसले यांच्या मातोश्री लहानुबाई भोसले (वय-९२) यांचे नुकतेच वृद्धापकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पाच मुले,दोन मुली,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.लहानुबाई भोसले या मितभाषी व धार्मिक स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध होत्या.त्यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या कुटुंबाला प्रतिकूल काळात आधार देण्याचे महत्वपूर्ण काम केले होते.आपले चिरंजीव प्रा.बापूसाहेब भोसले हे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या शर्यतीपर्यंत गेले आहे.त्यांना धीर व आधार देण्याचे त्यांनी मोलाचे काम केले होते.
त्यांच्यावर संवत्सर येथे गोदावरी तिरी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या अंत्यविधी समयी आ.राधाकृष्ण विखे,गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,डॉ.आचारी,बापूसाहेब सुराळकर,लक्ष्मण साबळे,आदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close