निधन वार्ता
शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष ढेपले यांना मातृशोक
जनशक्ती न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी व अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष चांगदेव ढेपले यांच्या मातोश्री जयवंताबाई बबनराव ढेपले (वय-७५) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात असा परिवार आहे.
स्व.जयवंताबाई ढेपले या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ म्हणून परिसरात परिचित होत्या.त्या संवत्सर येथील प्रगतशील शेतकरी व माजी ग्रामसेवक बबनराव ढेपले यांच्या त्या धर्मपत्नी होत्या.त्यांनी अत्यंत प्रातिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांचे भविष्य उज्वल केले होते.त्यांचा अंत्यविधी गोदावरी तीरी शोकाकुल वातावरणात संपन्न झाला आहे.
त्यावेळी गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर,उपसभापती अर्जुन काळे व विविध मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.