जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

राष्ट्रपती पदक प्राप्त शिक्षक नेते गायकवाड यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील डाऊच बु.येथील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सो.सा.गायकवाड या नावाने संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले सोमनाथ साळूबा गायकवाड (गुरुजी) यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी १३ जानेवारी रोजी राहात्या घरी दुःखद निधन झाले. त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई चे संचालक,अहमदनगर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष,पेन्शनर्स असोसिएशन महसूल विभाग नाशिकचे अध्यक्ष,डाऊच बु. ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष, प्राथमिक शिक्षकांचे नेते,समता चॅरीटेबल ट्रस्टचे मुखपत्र असलेल्या ‘समता वार्ता’ मासिकाचे व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे ‘क्रेडीट न्यूज’ या मासिकाचे सल्लागार संपादक अशा प्रकारची विविध विभागात अनेक पदे भुषवत स्वतःच्या कार्यशैलीमुळे महाराष्ट्रात एक नवीन ओळख निर्माण केली होती.
समता परिवार व राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने स्व.सोमनाथ साळूबा गायकवाड (गुरुजी) यांना समता पतसंस्थेत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. अंत्यविधी प्रसंगी समता परिवाराचे मार्गदर्शक व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे म्हणाले कि, ‘स्व.सोमनाथ गायकवाड (गुरुजी) हे समता पतसंस्थेच्या स्थापनेपासूनचे जेष्ठ व क्रियाशील सभासद होते, त्यांची समता परिवाराविषयी असलेली आत्मीयता सदैव आमच्या सोबत राहील. तसेच त्यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळात संचालक म्हणुन काम करताना त्यांच्या कामाची चुणूक दिसून येत असे. त्यामुळे सहकार चळवळीतील एक हिरा गमविला आहे. त्यांच्या आठवणी प्रत्यक्ष पतसंस्था चळवळीत काम करीत असताना स्मरणात राहतील.’
अंत्यविधी प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे माजी सभापती मच्छिंद्र टेके,शरद नाना थोरात, विविध संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक, हितचिंतक उपस्थित होते. बौध्द धर्माप्रमाणे अंत्यविधी करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यांच्या पश्चात ५ भाऊ, १ बहिण, मुले २, मुली २, सुना, नातू, पणतू असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close