गुन्हे विषयक
स्टेफणीसह टायर लंपास,कोपरगावात गुन्हा दाखल

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पुणतांबा चौफुली ते संवत्सर शिवारातील कच्चा रस्ता या ठिकाणी आज दि.१३ जानेवारीच्या रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास मारुती सुझुकी एर्टीगा कार मधून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यानी फिर्यादी शेरखान मुस्तफा खान (वय-५०) रा.त्रिमूर्ती बेकरीच्या मागे चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या मालकीच्या महिंद्रा बोलेरो या जीप गाडीचे रोख रकमेसह २१ हजार रुपये किमतीचे स्टेफणीसह टायर लंपास केले असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने संवत्सर परिसरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात अलीकडील काळात गुन्हेगारीचा आलेख लक्षणीयरीत्या वाढला आहे.चोरट्यांचा विविध लीला उदयास येत आहे.तर ओगदी शिवारात सुमारे सव्वा तीन लाखांचा दरोडा टाकून चोरट्यानी धूम ठोकली असून अद्याप चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही अशातच संवत्सर शिवारात हि घटना उघडकीस आली आहे त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात अलीकडील काळात गुन्हेगारीचा आलेख लक्षणीयरीत्या वाढला आहे.चोरट्यांचा विविध लीला उदयास येत आहे.तर ओगदी शिवारात सुमारे सव्वा तीन लाखांचा दरोडा टाकून चोरट्यानी धूम ठोकली असून अद्याप चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही अशातच संवत्सर शिवारात हि घटना उघडकीस आली आहे.फिर्यादी हे आपल्या वाहनातून काही माल वैजापूर येथे घेऊन जात असताना दि.१३ जानेवारी रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास आजूबाजूस कोणी नाही हे पाहून व चालक एकटाच असल्याची संधी साधत फिर्यादीला मारहाण करून चोरट्यांनी उभी असलेली महिंद्रा बोलेरो गाडीचे आठ हजार रुपये रोख व एकवीस हजार रुपये किमतीचे टायर स्टेफणीसह लबाडीच्या इराद्याने मोठा ऐवज लंपास केला आहे.या प्रकरणी फिर्यादी शेरखान मुस्तफा खान यांनी कोपरगाव तालुका पोलिसानी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अज्ञात दोन आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२५-२०२१ भा.द.वि.कलम ३९४,३४१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.