निधन वार्ता
माजी नगरसेवक वाणी यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेचे शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय बाबुलाल वाणी (वय-65) यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन भाऊ,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.संजय वाणी ही अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून कोपरगाव शहर आणि परिसरात परिचित होते.त्यांचे शहरात अनेक ठिकाणी व्यापारी संकुले होते.स्व.संजय वाणी हे सन -2006 ते 2011 या काळात माजी आ.काळे गटाच्या तत्कालीन माजी नगराध्यक्ष उज्वला अनिल जाधव यांचे कार्यकाळात कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक होते.
स्व.संजय वाणी ही अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून कोपरगाव शहर आणि परिसरात परिचित होते.त्यांचे शहरात अनेक ठिकाणी व्यापारी संकुले होते.स्व.संजय वाणी हे सन -2006 ते 2011 या काळात माजी आ.काळे गटाच्या तत्कालीन माजी नगराध्यक्ष उज्वला अनिल जाधव यांचे कार्यकाळात कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक होते.त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.ते काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाबुलाल वाणी यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते.त्यांच्या निधनाबद्दल आ.आशुतोष काळे,माजी आ.अशोक काळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,राजेंद्र झावरे,नूतन नगराध्यक्ष पराग संधान आदींनी दुःख व्यक्त केले आहे.


