जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

उध्दवराव रानोडे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतीनीधी)


   कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील प्रगतशील शेतकरी व ज्येष्ठ कार्यकर्ते उध्दवराव भिकाजी रानोडे (वय-78) यांचे गुरुवार दि.१६ ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजता निधन झाले आहे.संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधामध्ये सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

कै.उध्दवराव रानोडे.

  

   कै.उध्दवराव रानोडे हे दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांचे निष्ठावान कार्यकर्ते महणून संवत्सर पंचक्रोशीत परिचित होते.नामदेवराव परजणे यांच्या निधनानंतर गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या समवेत त्यांनी सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम केले मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार जमविला होता.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुलांचा सांभाळ करुन मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले.

  त्यांच्या पश्चात विलास व रमेश ही दोन मुले,पत्नी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.कै.उध्दवराव रानोडे यांच्या अंत्यविधीसमयी संवत्सर पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,उपसरपंच विवेक परजणे यांनी कै.रानोडे यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close