जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

बाबुराव नवले यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी


   कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील प. पू.पांडुरंग शास्त्री आठवले प्रणित स्वाध्याय चळवळीतील ज्येष्ठ व अग्रणी कार्यकर्ते बाबूराव भीमाशंकर नवले (वय -७७) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना काल गुरुवार दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक भाऊ,पत्नी,२ मुले,एक मुलगी असा परिवार आहे.

स्व.बाबूराव पा इटील नवले.

स्व.बाबुराव नवले हे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते स्व.पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या कार्याने प्रभावित झाले होते.त्यांनी त्या चळवळीत गेली ४० वर्षे स्वतःला झोकून दिले होते.त्यांनी माजी आ.स्व.दादासाहेब रोहमारे यांनी झगडेफाटा येथे उभारलेल्या महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यास स्व.पांडुरंग शास्त्री आठवले यांना आणण्यात सन -१९९७ साली मोठी भूमिका निभावली होती.त्यांनंतर माजी आ.के.बी.रोहमारे यांचे ते निष्ठावान सहकारी मानले जात असत.


  स्व.बाबुराव नवले हे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते स्व.पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या कार्याने प्रभावित झाले होते.त्यांनी त्या चळवळीत गेली ४० वर्षे स्वतःला झोकून दिले होते.त्यांनी माजी आ.स्व.दादासाहेब रोहमारे यांनी झगडे फाटा येथे उभारलेल्या महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याचे व ग्रामपंचायत व्यापारी संकुलाचे उद्घाटन करण्यास स्व.पांडुरंग शास्त्री आठवले यांना आणण्यात सन -१९९७ साली मोठी भूमिका निभावली होती.त्यांनंतर माजी आ.के.बी.रोहमारे यांचे ते निष्ठावान सहकारी मानले जात असत.या शिवाय कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष स्व.माधवराव शिंदे यांचेशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.त्यांच्या पोहेगाव विविध सेवा सहकारी संस्थेत त्यांनी अनेकवर्षे पद भूषवले होते.मितभाषी,अभ्यासू आणि नितळ मनाचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची पोहेगाव,कोपरगाव आणि नगर जिल्ह्यातील स्वाध्याय परिवारात ओळख होती.त्यांच्यावर आज सकाळी ९.३० वाजता पोहेगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.


दरम्यान त्यांच्या निधनाबद्दल माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सचिन रोहमारे,बाजार समितीचे संचालक अशोक नवले,पोलिस पाटील जयंत रोहमारे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close