जाहिरात-9423439946
निधन वार्ता

सुधाकर दंडवते यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या गौतम सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर वामनराव दंडवते (वय-६८)यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन भाऊ,पाच बहिणी,पत्नी,दोन मुले,मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाबद्दल माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे आदींनी शोक व्यक्त केला आहे.

 

स्व.सुधाकर दंडवते यांना द्राक्ष शेतीची त्यांना आवड असल्यामुळे प्रगतशील द्राक्ष बागायतदार म्हणून त्यांची कारवाडी आणि परिसरात ओळख होती.ते राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे विभागीय संचालक असल्यामुळे सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या बैठकीसाठी ते सोलापूर येथे गेले असता शनिवार रोजी पहाटेच्या सुमारास हि दुर्दैवी घटना घडली आहे.

कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील रहिवासी असलेले व कारवाडी ग्रामपंचायतचे प्रथम माजी सरपंच सुधाकर दंडवते हे काळे गटाचे विश्वासू सहकारी होते.कर्मवीर शंकरराव काळे,माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे यांच्या समवेत सामाजिक,राजकीय कामात त्यांचा सक्रीय सहभाग राहत असे.त्यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक,जिल्हा परिषदेचे दोन वेळा सदस्य तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे.गौतम सहकारी बँकेचे अध्यक्ष व गायत्री नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करतांना त्यांनी या पदांना आपल्या कामातून न्याय दिला आहे.

दरम्यान त्यांचा मोठा मुलगा राहुल शेती करतो तर दुसरा मुलगा सागर अमेरिकेत अभियंता म्हणून वास्तव्यास आहे.अतिशय मनमोकळा स्वभाव व सर्वांशी त्यांचे आपुलकीचे नाते होते.त्यांच्या निधनामुळे कारवाडी व पंचक्रोशीतील गावांमध्ये शोककळा पसरली आहे.कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पासून काळे परिवाराशी संपर्क होता.त्यांच्या अकाली निधनामुळे काळे परिवाराने विश्वासू सहकारी गमावला असल्याचे माजी आमदार अशोक काळे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close