जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

काशिनाथ शिंदे यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी व महवितरण कंपनीचे सेवानिवृत्त तारतंत्री काशिनाथ रेवजी शिंदे यांच्या मातोश्री म्हाळसाबाई रेवजी शिंदे (वय-९२) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पाच मुले,दोन मुली,नातवंडे आदी परिवार आहे.त्यांच्यावर जवळके येथील शिंदे वस्तीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

  स्व.म्हाळसाबाई शिंदे या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून जवळके आणि परिसरात परिचित होत्या.त्यांच्या पश्चात निळवंडे  कालवा कृती समितीचे कार्यकर्ते नवनाथ शिंदे,गोरक्षनाथ शिंदे तसेच विश्वनाथ शिंदे,भागवत शिंदे,सुलोचना गव्हाणे आदी मुले व मुली असा परिवार आहे.

  त्यांच्या अंत्यविधी समयी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,माजी सरपंच वसंत थोरात,बंडू थोरात,दत्तात्रय थोरात,विजय थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात,अलकाताई शिंदे आदींसह बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close