जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

ज्येष्ठ कार्यकर्ते…उगले यांचे निधन 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब कारभारी उगले यांचे बुधवार दि.२० सप्टेंबर रोजी अकाली निधन झाले आहे. त्यांच्यावर संवत्सर येथे गोदावरी काठावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.यावेळी संवत्सर परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्याच्या पश्चात पत्नी लक्ष्मीबाई,सोमनाथ व सूर्यकांत ही दोन मुले,दोन मुली,भाऊ,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

स्व.भाऊसाहेब उगले हे दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांचे विश्वासू सहकारी मानले जात.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे निस्सीम भक्त म्हणून ते परिचित होते.महंत रमेशगिरीजी महाराज व शांतीगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करुन आध्यात्मिक क्षेत्रात नांवलौकीक प्राप्त केलेला आहे.संवत्सर परिसरातील वाघीनाला (पढेगांवरोड) परिसरात स्वखर्चातून कमलादेवीचे मोठे व अतिशय  सुंदर असे  मंदीर त्यांनी बांधलेले असून नित्यनेमाने ते कमलादेवीची पूजाअर्चा करीत असत.

त्यांच्या निधनाबद्दल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,संवत्सर ग्रामपंचायतीचे उप सरपंच विवेक परजणे, सरपंच सुलोचना ढेपले यांनी शोक व्यक्त करून श्रध्दांजली वाहिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close