निधन वार्ता
तुकाराम कोळपे यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी व सुरेगाव पंचक्रोशीतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व तुकाराम बाजीराव कोळपे (वय ५८ वर्षे )यांचे आज सायंकाळी निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,पुतणे,भावंडे,एक बहीण असा मोठा परिवार आहे.
स्व.तुकाराम कोळपे हे अभ्यासू आणि मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून परिसरात परीचित होते.ते शहाजापुर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक होते.त्यांचा नजीकच्या परिसरात मोठा जनसंपर्क होता.
त्यांचा अंत्यविधी सोमवार दि.१४ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता कोळपेवाडी वैकुंठधाम येथे संपन्न झाला आहे.स्व.तुकाराम कोळपे यांच्या निधनाने कोळपेवाडी आणि परिसरात शोककळा पसरली आहे