गुन्हे विषयक
…या तालुक्यात दोन बळी,अकस्मात मृत्यू की घातपात ?

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात शिंगणापूर शिवारात रेल्वे मार्गावर एक ३७ वर्षीय तरुणाचा मृतदेह पोलिसांना मिळाला असून काल भोजडे शिवारात कोळ नदीपात्रात एक मृतदेह पुराच्या पाण्यात जाऊन जाताना आढळून आला असून तो एका स्थानिक तरुणाचा असल्याची माहिती मिळाली आहे.यातील शिंगणापूर शिवारातील मृतदेहाची अकस्मात मृत्यूची नोंद कोपरगाव शहर पोलिसांनी केली आहे.पुढील तपास पोलिस करत आहे.हे मृतदेह घातपात आहे की आत्महत्या हे पोलिस चौकशीत उघड होणार आहे.

दरम्यान दुसरी घटना आज दुपारी ०१ वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर शिवारात रेल्वे मार्गावर कि.मी.४६०/२० जवळ उघड झाली आहे.यात एक तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.त्याचे अंदाजे वय ३७ वर्षे आहे.त्याने आत्महत्या केली की त्याचा काही घातपात आहे हे समजू शकले नाही.त्याचा तपास पोलीस करत आहेत.
कोपरगाव तालुक्यामध्ये दि.२७ सप्टेंबर पासून सलग दोन दिवस वादळ वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता.परिणामी या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची दैना उडाली होती.सोयाबीन,मका,ऊस,कापूस,फळबागा आदी पिकांचेमोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकात अद्यापही मोठ्या प्रमाणावर पाणी असून अद्याप पाऊस थांबण्याची चिन्हे नाही आजही पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे शेतकऱ्यांची त्यामुळे चिंता वाढली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेशाने तालुका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून स्थळ पंचनामे सुरू केले असेल आहे.मात्र अद्यापही तालुक्यात नद्या दुथडी भरून वाहत असून यात अनेक मृतदेह सापडत असून अशीच एक घटना तालुक्याच्या पूर्वेस भोजडे येथील कोळ नदीत समृध्दी महामार्गाच्या खाली आढळून आली असून या नदीत एका अज्ञात तरुणाचा मृतदेह काटेरी वनस्पतींना अडकला असल्याचे पूर कमी झाल्यावर आढळून आले होते.या प्रकरणी तेथील ग्रामस्थांनी कोपरगाव तालुका पोलिसांना या बाबत खबर दिली होती.त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे.मात्र त्याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली किंवा नाही ही माहिती समजू शकली नाही तर सदर तरुण हा भोज डे येथील असून त्याचे नाव कचरू सोळसे असे असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान दुसरी घटना आज दुपारी ०१ वाजेच्या सुमारास शिंगणापूर शिवारात रेल्वे मार्गावर कि.मी.४६०/२० जवळ उघड झाली आहे.यात एक तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.त्याचे अंदाजे वय ३७ वर्षे आहे.याबाबत रेल्वे पोलिसांनी याबाबत शहर पोलिसांना याबाबत खबर देऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन त्यांची रवानगी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात केली होती.तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासणी करून मृत घोषित केले आहे.व या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांना खबर दिली होती.
दरम्यान या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे,पोलिस हेड कॉन्स्टेबल पी.डी.सोनवणे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.६५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल सोनवणे हे करीत आहेत.