जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

…या केंद्रीय मंत्र्यांचा नगर दौरा,आढावा बैठक संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी लोकसभा केंद्रीय मंत्री प्रवास या अंतर्गत चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल दौलतराव आहेर यांनी अकोले तालुक्यात जेथे केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहे त्या ठिकाणी भेट दिली व आढावा घेतला आहे.

यावेळी माजी आ.वैभव पिचड,जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,सरचिटणीस नितीन दिनकर,जालिंदर वाकचौरे,सुनील वाणी,तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी,शिवाजी धुमाळ,सोशल मिडिया संयोजक भाऊसाहेब वाकचौरे,लोकसभा मंत्री प्रवास योजना संयोजक योगीराज परदेशी,युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख,अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे,अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर,विजय पवार, अशोक आवारी,प्रसन्न धोंगडे आदी उपस्थित होते.

अगस्ती आश्रमास भेट घेऊन अगस्ती महाराज यांचे दर्शन घेऊन आरती केली.यावेळी देवस्थान ट्रस्ट च्या वतीने शाल,श्रीफळ,अगस्ती ऋषी महात्म्य ग्रंथ देऊन सत्कार विश्वस्त किसन लहामगे, व्यवस्थापक रामनाथ मुतडक,मच्छिंद्र भरीतकर आदी उपस्थित होते.

आदिवासी समाजाचे जेष्ठ नेते,माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या प्रकृतीची चौकशी केली.तसेच तत्कालीन मंत्री डॉ.दौलत आहेर व विरोधी पक्षनेते मधुकर पिचड यांच्या संबंधांना उजाळा दिला. यावेळी फेटा व शाल देऊन आमदार आहेर यांचा सत्कार करण्यात आला.पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या बीज बँकेला भेट दिली.त्यावेळी अशिक्षित असणाऱ्या राहीबाई यांचे विचार ऐकून डॉक्टर असणारे राहुल आहेर हे चकित झाले.आजार व दवाखाना यातून सुटका करण्यासाठी देशी बी बियाणे यांचा वापर करावा अन रासायनिक खते व औषध वापरू नका असे आवाहन त्यांनी केले.

कुंभेफळ ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली गावात राबविण्यात येणाऱ्या योजना ची माहिती घेतली. यावेळी सरपंच प्रज्ञा पवार,उपसरपंच भास्कर कोटकर,अमोल कोटकर,सुनील कोटकर, दिलीप कोटकर,विशाल कोटकर आदी उपस्थित होते.शेषनारायन चे दर्शन घेतले.जनजाती कल्याण आश्रमाच्या कार्याची माहिती करून घेतली.प्राचार्य कचरे,दिपक जोंधळे,रामदास सोनवणे यांनी माहिती दिली.देवठाण येथील गिर्हेवाडी ला भेट देऊन आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके,सरपंच केशव बोडके,श्रीकांत सहाणे यांनी पाणी पुरवठा योजना,घरकुल योजना बाबदच्या समस्या सांगितले. कळस खुर्द येथे गुलाब तेलम यांनी स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close